नरडाणा येथे चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

नरडाणा येथे चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

नरडाणा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) | प्रतिनिधी – डी. एम. आखाडे

साई चरीटेबल संस्था संचलित माध्यमिक व प्राथमिक-उच्च प्राथमिक विद्यामंदिर, नरडाणा येथे चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. याच वेळी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत नालंदा बौद्ध विहाराच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमही संपन्न झाला.मेरा युवा भारत, मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था धुळे आणि साई चरीटेबल संस्था संचलित शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील पहिल्या ते सहाव्या क्रमांकाच्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांना 13 मार्च 2026 रोजी सकाळी शाळेच्या सभागृहात ट्रॉफी, प्रमाणपत्र, वही व पेन देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ तीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही ट्रॉफी, प्रमाणपत्र, वही व पेन देऊन सन्मानित करण्यात आले.हा कार्यक्रम मेरा युवा भारत, धुळे – खेल व युवा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने जिल्हा युवा अधिकारी मा. अशोककुमारजी मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.या वेळी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगत पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वृक्षांमुळे प्राणवायू मिळतो, उष्णतेवर मात करता येते, हवेतील गारवा वाढतो आणि मानवी जीवन अधिक सुखकर होते. घर, अंगण, बाग-बगीचे तसेच रस्त्यांच्या कडेला वृक्ष लागवड केल्यास पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत होते, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमात श्री. धनगर सर, मनोहर रोहीदास पाटील, जगदीश भिमराव पाटील, अमोल राजेंद्र पाटील, महेंद्र रुपेश पाटील आणि श्रीमती ऐश्वर्या सतीश ठाकरे यांनी सहभाग घेतला.त्यानंतर ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाच्या अनुषंगाने नरडाणा येथील नालंदा बौद्ध विहाराच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विहार परिसरात सुमारे 25 विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.सदर कार्यक्रमात नालंदा बौद्ध विहाराचे सचिव श्रीकांत बैसाणे, यशवंत मंगळे यांच्यासह विहाराच्या कार्यकारिणी सदस्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. धनगर सर, श्रीकांत बैसाणे (सचिव, नालंदा बौद्ध विहार नरडाणा) तसेच डॉ. डी. एम. आखाडे (अध्यक्ष, मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था, धुळे) यांनी विशेष परिश्रम घेतले.

3 thoughts on “नरडाणा येथे चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

  1. Betfest is where the action is at! Great odds and a huge selection of events to bet on. This is my go-to spot for sports betting. betfest

  2. Alright, xbjili is on my radar. Gotta say, the interface looks clean. And I’m hearing they got some good payouts. Might just throw some chips their way and see what’s up. xbjili

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *