जिल्हा परिषद शाळा मोहिदे त.श. येथे ७७वा “प्रजासत्ताक दिन” उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उपसरपंच सौ. ललिता पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. श्रद्धा पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. त्यानंतर, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करून संगीतमय कवायत घेण्यात आली.
या प्रसंगी ग्रामसेवक श्री. हिम्मत वंजारी साहेब, तलाठी श्री. सचिन शिंदे साहेब, पोलीस पाटील श्री. मुकेश गवळे साहेब, महसूल सेवक श्री. सचिन जाधव साहेब, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अनिलदादा पाडवी व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी, पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणास मान्यवरांनी भरभरून दाद देत त्यांचा उत्साह वाढविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षक श्री. रितेश कापूरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मालिनी सोनवणे मॅडम यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका श्रीमती शालिनी रत्नपारखे मॅडम तसेच शिक्षिका सारिका जाधव मॅडम, अशोक महाजन सर, सुरेंद्र जोशी सर, नरेश राठोड सर, चांगदेव चव्हाण सर, बुध्या पटले सर आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Umcassinoonline is alright. Got some interesting options and the user interface is pretty clean. Nice change of pace umcassinoonline!
777cbgame is a blast! Reminds me of the old-school arcades. Go check it out to see what I mean 777cbgame!
Hello88com is a solid choice. Plenty of games and a decent sign-up bonus. Why not give it a try hello88com!