*असलोद अमरधाम येथे पाण्याच्या टाकीच्या बांधकामास प्रारंभ**सामाजिक कार्यकर्ते दिलवर गिरासे यांचे आजोबांच्या स्मरणार्थ योगदान

*असलोद अमरधाम येथे पाण्याच्या टाकीच्या बांधकामास प्रारंभ**सामाजिक कार्यकर्ते दिलवर गिरासे यांचे आजोबांच्या स्मरणार्थ योगदान*असलोद, ता. शहादा, जि. नंदुरबार (प्रतिनिधी : संजय जगताप): असलोद येथील अमरधाम परिसराच्या सुशोभीकरणासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेत विविध विकासकामे हाती घेतली आहेत. अमरधाम येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दिलवर गिरासे यांनी आपल्या स्वखर्चातून पाण्याच्या टाकीच्या बांधकामास प्रारंभ केला आहे.ही पाण्याची टाकी त्यांचे आजोबा कै. मंगेश मानसिंग गिरासे, माजी अध्यक्ष, नागेश्वर किसान शिक्षण प्रसारक मंडळ, यांच्या पवित्र स्मरणार्थ उभारण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अमरधाम येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होणार आहे.याशिवाय गावातील युवक व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अमरधाम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. गावातील नागरिकांनी स्वखर्चातून बसण्यासाठी बाकांची व्यवस्था केली असून ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अमरधाम परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत होत आहे.गावातील युवक, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था व ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागातून अमरधामच्या विकासासाठी सुरू असलेल्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते दिलवर गिरासे यांच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या कार्याचे ग्रामस्थांनी स्वागत करून त्यांच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.*फोटो मथळा* : असलोद येथील अमरधाम परिसरात पाण्याच्या टाकीच्या बांधकामास प्रारंभ करताना सामाजिक कार्यकर्ते दिलवर गिरासे तसेच उपस्थित ग्रामस्थ.