*रुग्णालयात जाऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा
*नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार तथा सर्वांचे लाडके नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांची प्रकृती आता वेगाने सुधारत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांची भेट घेतली.आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत दोन महिन्यांपूर्वी हृदयविकारामळे बिघाड झाला होता. त्यावरील उपचार चालू असल्यामुळे मुंबई येथील रुग्णालयात दोन महिन्यांपासून दाखल आहेत. पूर्वीपेक्षा आता वेगाने प्रकृतीत सुधार होत असून सर्व प्रकारच्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे व्हिडिओ कॉल द्वारे त्यांची भेट घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांशी त्यांनी संवाद सुरू केला आहे. संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या माध्यमातून जिल्हाभरातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद घडताना दिसत आहे. विविध बैठक मेळाव्यांमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सूचना करणे सुरू केले आहे. अनेक प्रमुख पदाधिकारी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करू लागले आहेत. परिणामी डॉक्टर गावित समर्थकांच्या वर्तुळात एक नवा उत्साह संचारलेला दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. विचारपूस करून काही मुद्द्यांवर चर्चा केली. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ कुमुदिनी गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित उपस्थित होते. याच्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह मान्यवर नेते तब्येतीची विचारणा करण्यासाठी रुग्णालयात येऊन गेले आहेत.
