क्रॉपसॅप योजनेअंतर्गत शेती शाळा प्रशिक्षण वर्ग संपन्न
मौजे कानडी त.श. तालुका शहादा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग वतीने खरीप हंगाम 2026 अंतर्गत पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प ( क्रॉपसॅप)योजनेतील कापूस पिकावरील शेती शाळा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला असून सदर प्रशिक्षण वर्गास कापूस पिका पिकासाठी आंतरमशागत रासायनिक खताची शिफारसीनुसार मात्रा देणे तसेच जैविक कीडनाशकांचा वापर करणे याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी कोकिळा बिरारे यांनी मार्गदर्शन केले. शेती शाळेचा तिसरा प्रशिक्षण वर्ग सुविधाकार शेतकरी श्री एकनाथ काशीराम पाटील यांच्या शेतावर शेती शाळा वर्ग घेण्यात आला. सदर प्रशिक्षण वर्गात सांघिक खेळ ,मागील प्रशिक्षण वर्गाचा मागोवा घेतला व पुढील नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच एल निनो च्या परिणामामुळे पावसाचा अनिमितपणा, पावसाचा खंड याबाबत आपत्कालीन परिस्थितीत करावयाचे उपाय योजना बाबत माहिती देण्यात आली तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात आले त्याचप्रमाणे फळबाग लागवड योजनेतही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा याबाबत आवाहन करण्यात आले. महिलांसाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याबाबत माहिती देण्यात आली व शेतकऱ्यांच्या मनोगत आणि संस्थेचा अभ्यास करून वर्गाचा समारोप करण्यात आला यावेळी श्री छोटूलाल पाटील श्री अंबालाल पाटील व श्री दरबार सिंग गिरासे तसेच इतर शेतकरी उपस्थित होते.
