विदेशी दारू तस्करीचा मोठा पर्दाफाश; ४ कोटी २ लाखांचा मुद्देमाल जप्त, १० आरोपी निष्पन्न, ९ जणांना अटक

विदेशी दारू तस्करीचा मोठा पर्दाफाश; ४ कोटी २ लाखांचा मुद्देमाल जप्त, १० आरोपी निष्पन्न, ९ जणांना अटक

शहादा | प्रतिनिधीनंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद गावाजवळील बंद पडलेल्या कपास जिनिंग परिसरात सुरू असलेल्या विदेशी दारू तस्करीचा म्हसावद पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ४ कोटी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १४ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात १० आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी नऊ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश शिवाजी वावरे यांनी दिली.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बंद पडलेल्या जिनिंगवर धाड टाकली असता मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्याचा साठा आढळून आला. प्राथमिक तपासात या ठिकाणाचा वापर गुजरात राज्यात विदेशी दारूची तस्करी करण्यासाठी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान ट्रक, ट्रॉला, आलिशान कारसह एकूण १४ वाहने जप्त करण्यात आली.पोलीस तपासात या प्रकरणातील १० आरोपींची ओळख निश्चित करण्यात आली असून त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक रमेश शिवाजी वावरे यांनी सांगितले.दरम्यान, विदेशी मद्याचा साठा नेमका कुठून आणण्यात आला, तस्करीचे जाळे किती व्यापक आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास म्हसावद पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू तस्करीविरोधात पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.