शहादा तालुक्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेपासून वंचित महिलांसाठी शिवसेनेचे पंचायत समितीमध्ये साकडे!

शहादा तालुक्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेपासून वंचित महिलांसाठी शिवसेनेचे पंचायत समितीमध्ये साकडे!

बामखेडा/शहादा (प्रतिनिधी):शहादा तालुक्यातील ससदे, बिलाडी, बामखेडा, तीखोरा, पिंगाने यासह विविध ग्रामीण भागातील अनेक महिला शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेपासून अद्याप वंचित आहेत. या महिलांनी शिवसेना नेते व आमदार श्री. चंद्रकांत रघुवंशी तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. रामभैय्या रघुवंशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली होती. यावर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा तालुका प्रमुखांना वंचित महिलांना तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आदेश दिले.आमदारांच्या सूचनेनुसार, शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल आणि शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी वंचित महिलांसह शहादा पंचायत समिती येथे जाऊन बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे साकडे घातले व महिलांच्या अडचणी मांडल्या.अधिकाऱ्यांचे सकारात्मक आश्वासनयावेळी पंचायत समितीतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. रवींद्र कुलकर्णी व मनमोहिनी शिंदे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. सागर चौधरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.त्यानंतर श्री. सागर चौधरी यांनी तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्याशी चर्चा करताना सांगितले की:”सर्व वंचित महिलांच्या अर्जांची तात्काळ पडताळणी केली जाईल. ज्या त्रुटींमुळे महिला योजनेपासून वंचित राहिल्या आहेत, त्यांची पूर्तता करून त्यांना लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल. तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाईल.”शिवसेनेचा जनआंदोलनाचा इशाराप्रशासनाला निवेदन दिल्यानंतर तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी स्पष्ट केले की, जर महिलांना या योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळाला नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.या प्रसंगी शिवसेना शहादा शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, जयसिंग ठाकरे, अजय सोनवणे, गोपाल कोळी, गणेश ठाकरे, पृथ्वीराज राजपूत, आक्काताई ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि वंचित महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.