किरकोळ कारणावरुन घडलेल्या मारहाणीच्या गुन्हयाला धार्मिक वादाचा रंग देण्याचा प्रयत्न करणारे इसम नंदुरबार शहर पोलीसांच्या ताब्यात..!दि. 13/03/2026 रोजी मध्यरात्रीचे वेळेस छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदीर समोर नंदुरबार शहरातील दोन गटात वाहनाचे कट लागुन भांडण झाले. सदर दोन्ही गटातील इसमांनी एकमेकांविरुध्द तक्रारी दाखल करत त्याअन्वये नंदुरबार शहर पो.ठाणे गु.र.नं. 363/2026 व गु.र.नं. 364/2026 अन्वये परस्परांविरोधात क्रॉस गुन्हे दाखल झाले होते. त्यातील गु.र.नं. 363/2026 या गुन्हयात कसलाही धार्मिक वाद झाल्याचे फिर्यादीचे म्हणणे नसतांनाही त्याच गुन्हयातील साक्षीदार नामे समीर खान शेर खान पठाण, वय- 26 वर्षे, रा. पटेलवाडी, ता.जि. नंदुरबार याने या घटनेला धार्मिक वादाचे स्वरुप देऊन शहरातील सामाजिक शांतता बिघडविल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यामुळे शहरात काही काळ गैरसमज पसरविणारी अफवा पसरली होती.त्याअन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोउपनिरीक्षक श्री. भुनेश मराठे यांचे फिर्यादीवरुन 1. समीरखान शेर खान पठाण, वय 26 वर्षे, रा. पटेलवाडी, ता. जि. नंदुरबार 2. शाहरुख खान रहीम खान पठाण ऊर्फ मास, वय- 29 वर्षे, रा. जुना बैल बाजार, नंदुरबार 3. शेख शोएब शेख फारूक ऊर्फ माज, वय- 26 वर्षे, रा.काली मश्जिद जवळ, नंदुरबार अशांविरुध्द गु.र.नं. 366/2026 भा. न्या. संहिता 2023 चे कलम 192, 353(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.”वैयक्तिक वादाला धार्मिक रंग देणाऱ्यांवर या कारवाईमुळे जबर बसेल व शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहील,” यासाठी नंदुरबार शहर पोलीसांकडून सदरची कारवाई करण्यात आली आहे.
किरकोळ कारणावरुन घडलेल्या मारहाणीच्या गुन्हयाला धार्मिक वादाचा रंग देण्याचा प्रयत्न करणारे इसम नंदुरबार शहर पोलीसांच्या ताब्यात

Weatistheph90, haven’t heard of that one. Hopefully, it’s something cool! Either way, good luck exploring!weatistheph90
Xoplay? I’ve given it a spin! Their live games are pretty fun, especially if you’re looking for some interaction. Check ’em out!xoplay
Y666Download – tons of cool apps and games to find here. A good spot to check if you like gaming!y666download