*महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या वतीने, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांमध्ये 15 लाख मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान राबविण्याचे आवाहन संबंधित विभागाने केलेले आहे.*💫 त्याप्रमाणे आत्मरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे दिले जात आहे. हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात आला आहे.💫 जागतिक महिला दिन चे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यामधील जिल्हा परिषद शाळा गुलीउंबर येथेयाठीकाणी प्रशिक्षण देण्यात आले. 💫 यावेळी केंद्रप्रमुख वसंत गावित, मुख्याध्यापक- रवींद्र महाले, सरपंच- राकेश नानसिंग वळवी, येथील आरोग्य विभागातील सबसेंटरचे ए.एन.एम. कमल तडवी, जिल्हा परिषद शाळेचे शाळेचा विद्या वळवी, मंगला भामरे, माधवी पाडवी, दिलवरसिंग वसावे तसेच जिल्हा समन्वयक श्री. दिपक पाठक सर, श्रीमती.प्रणाली चव्हाण मॅडम, श्रीमती. वंदना पाडवी मॅडम, श्रीमती शालिनी देसले.श्री. मयूर भोई सर, श्री. सावण वसावे सर हे उपस्थित होते.💫 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील शाळांमध्ये मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हातील 233 शाळांमध्ये सध्या हे अभियान राबविण्यात येत असून, आश्रम शाळा, जिल्हा परिषदेच्या व महापालिकेच्या शाळांमध्येही मोठ्या संख्येने मुली या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.💫 या अभियानांतर्गत मुलींना स्वसंरक्षणासाठी आवश्यक विविध प्रकारचे प्रशिक्षण, पात्र प्रशिक्षकांकडून दिले जात आहे. राज्यातील मुलींना अधिकाधिक अद्ययावत व परिपूर्ण प्रशिक्षण मिळावे, यासाठी *राज्याच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या शालेय शिक्षण विभागाकडून राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा योजना* विशेष मार्गदर्शन व सराव सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. 💫 या प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मुलींना योगाचेही प्रशिक्षण दिले जात आहे. योगामुळे मुलींमध्ये उत्साह, शारीरिक तंदुरुस्ती तसेच मनोबल वाढले. तसेच मिलिटरी ट्रेनिंग चे ही प्रशिक्षण दिले जात आहे, असा हा एकंदरीत उपक्रम राबविला जात असल्याची माहिती स्थानिक प्रशासनातील खापर केंद्रप्रमुख श्री वसंत गावित सर यांनी दिली.

Best slot action I have found in the PH region. The bonuses are generous and the games are genuinely exciting. I am sticking with jl33slot from now on.