नंदुरबार जिल्हा कुंभार समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव व समाज परिचय मेळावा प्रकाशा येथे संपन्न

(प्रतिनिधी पंकज गुरव प्रकाशा) प्रकाशा: दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी श्रीक्षेत्र प्रकाशा केदारेश्वर मंदिर येथे कुंभार समाज नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाज परिचय मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले..तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कुंभार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.रमाकांतजी क्षीरसागर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मा.महेशजी सायकर मुंबई मा.संजयजी रुईकर नांदेड,शरद वाडेकर,महाराष्ट्र प्रदेशचे कोषाध्यक्ष सोमनाथ सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष मा.बबनरावजी जगदाळे नवापूर, रमण लाल प्रजापति डॉ.सुधाकर जी शेंडोकार अमरावती,खान्देश विभागीय अध्यक्ष मा.रतीलालजी कुंभार शिरपूर, जळगाव जिल्हाध्यक्ष मा.चंद्रशेखर कापडे, धुळे जिल्हाध्यक्ष मा.किशोर कुंभार, सेवानिवृत्त पीएसआय मा.भगवान सूर्यवंशी मुंबई, सचिव मा.अनिल चित्ते आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व बुके देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेले इयत्ता 10वी 12वी, पदवीधर,पदव्युत्तर सेवानिवृत्त,विशेष कामगिरी केलेल्या समाज बंधू-भगिनींना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करताना यशस्वीतेचे कौतुक करण्यात आले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे..ज्याने प्राशन केले तो गुरगुरणारच…तसेच नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता अतिशय चांगली असून जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी उच्च पदावर जात आहेत याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे प्रदेशाध्यक्ष मा. रमाकांत क्षीरसागर यांनी केले. समाजातील विविध स्थरातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली..उपस्थितांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत असे स्तुत्य उपक्रम राबत राहावे असे मत व्यक्त केले..या कार्यक्रमाचा माध्यमातून कुंभार समाजाने एकत्र येण्याचा सामाजिक एकात्मतेचा एक सुंदर आदर्श घालून दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष भगवान रामदास कुंभार, जिल्हा उपाध्यक्ष छोटूलाल प्रजापति,खगेन्द्र मोहन कुंभार, एकनाथ विठ्ठल कुंभार, शशिकांत महादू कुंभार, छोटूलाल लक्ष्मण कुंभार, आनंदा देविदास प्रजापति,धर्मेश भाई प्रजापती, रोहिदास बाविस्कर, युवा जिल्हाध्यक्ष दिनेश वाडीले, आनंद कुंभार, उद्योजक दीपक, चंद्रशेखर वाडीले, प्रा.बाळकृष्ण मोरे, प्रवीण बुधा कुंभार, सेजल कुंभार आदी पदाधिकाऱ्यांनी व युवक संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हृदयेश चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन प्रा. संजय खैरनार व प्रा.सौ.आशा सोनवणे यांनी केले तर आभार नारायण वाघ यांनी व्यक्त केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!