धुळे माय भारत केंद्राच्या नवनियुक्त जिल्हा युवा अधिकारी अदिती सिंह यांचे पदभार ग्रहणयुवा उपक्रमांना चालना देण्यासाठी मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार; विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा
कृष्णा कोळी संपादक
धुळे, दि. २८ सप्टेंबर २०२६ :माय भारत, धुळे कार्यालय, इंदिरा गार्डनजवळ येथे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत माय भारत केंद्र, धुळेच्या नवनियुक्त जिल्हा युवा अधिकारी अदिती सिंह (आयआयटी दिल्ली, बी.टेक.) यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांच्या पदभार स्वीकारल्यानंतर मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था, धुळे यांच्या वतीने त्यांची भेट घेऊन स्वागत करण्यात आले.यावेळी धुळे जिल्ह्यात माय भारत केंद्र, धुळेच्या माध्यमातून संस्थेने आतापर्यंत राबविलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक, युवा व जनजागृतीपर उपक्रमांची माहिती जिल्हा युवा अधिकारी अदिती सिंह यांना देण्यात आली. तसेच आगामी काळातही माय भारत केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये संस्थेचा सक्रिय सहभाग राहणार असून, युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध राहील, अशी ग्वाही संस्थेच्या वतीने देण्यात आली.यावेळी धुळे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. युवकांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, कौशल्यविकास, स्वयंसेवी वृत्ती तसेच राष्ट्रनिर्माणाची भावना वाढीस लागण्यासाठी माय भारत केंद्राच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.धुळे जिल्ह्यातील तरुणांचे तसेच माय भारत केंद्र, धुळे कार्यालयाशी संलग्न असलेल्या विविध युवा मंडळांचे सहकार्य आगामी उपक्रमांसाठी अपेक्षित असल्याचेही चर्चेदरम्यान नमूद करण्यात आले. केंद्राच्या माध्यमातून युवकांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था आणि युवा मंडळांनी समन्वयाने काम करण्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.या भेटीप्रसंगी माय भारत केंद्र, धुळे कार्यालयातील श्री. चेतन पाटोळे यांची उपस्थिती होती. डी. एम. आखाडे, अध्यक्ष, मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था, धुळे यांनी नवनियुक्त जिल्हा युवा अधिकारी अदिती सिंह यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.आगामी काळात माय भारत केंद्र, धुळे आणि विविध सामाजिक व युवा संस्थांच्या समन्वयातून जिल्ह्यातील युवकांसाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविले जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
