चिमठाणे परिसर – तालुका -प्रतिनिधी -प्रविण भोई.,..१८८६ साली स्थापन जिल्हा परिषद केंद्र शाळा चिमठाणे मुलांच्या शाळेला कुलूप शाळेवर वटवाघुळाचे विघ्न……. चिमठाणा येथील केंद्र शाळा चिमठाणे नंबर १ प्राथमिक मुलांची या शाळेला शिक्षक कर्मचाऱ्यांनी कुलूप ठोकले आहे. ही शाळा स्वातंत्र्यपूर्व काळातील १८८६ साली या शाळेची स्थापना झाली. मात्र आतापर्यंत या शाळेला कधी कुलूप लावण्याची वेळ आली नव्हती ….शाळा बंद करण्याचे कारण काय?- असे काय घडले की त्या कारणाने या शाळेला कुलूप लावण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली . जिल्हा परिषद केंद्र शाळा नं १चिमठाणे या शाळेच्या नावाशी चिमठाणे वाशीयांची प्रत्येक व्यक्तीशी नाड जुडलेली दिसून येते. मात्र वटवाघुळांच्या त्रासाने ही शाळा बंद पडली असे शिक्षक कर्मचाऱ्यांनी सांगितले. रात्री या शाळेत वटवाघुळ आपले घर करून राहतात. सकाळी या परिसरात पूर्ण वर्गांनमध्ये वटवाघुळ घाण करतात मुलांना त्याचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून आम्ही शाळेचे स्थलांतर केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आम्ही गट शिक्षण अधिकारीना देखील तक्रार केली मात्र कोणी तक्रारीची दखल घेतली नाही. असे शिक्षक कर्मचाऱ्यांनी सांगितले तक्रारी केल्या मात्र आमच्या तक्रारीकडे कोणी लक्ष दिले नाही. मुलांच्या स्वास्थ्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. असे शिक्षक कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. स्थलांतरित इमारत धोकेदायक असून त्या ठिकाणी वर्ग भरवले जात आहेत. जिल्हा परिषद शाळेतुन ज्या शाळेत मुलांचे स्थलांतर करण्यात आले आहे.त्या शाळेच्या भिंतीवर स्पष्ट लिहिलेले आहे. सदरील इमारत धोकेदायक असून या ठिकाणी कोणी थांबू नये आशयाचे लिखाण त्या ठिकाणी केले असून त्याच ठिकाणी मुलांचे वर्ग भरत असतील तर मुलांच्या सुरक्षितेचे काय? स्थलांतरित इमारतीत सोयी सुविधांचा अभाव. स्वच्छतागृहाची दुरावस्था झालेली आहे. स्वछता गृहाचा पत्रा तुटलेल्या अवस्थेत.स्वछता गृहात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळाले..स्वछता गृहच्या वरती कुठलेही छत नाही. स्वच्छतागृहाच्या समोर कुठलीही संरक्षण भिंत नाही… सामाजिक कार्यकर्ता (सोनू फौजी )करणार पाठपुरावा आणि तक्रार -सोनू फौजी यांनी दोन्ही शाळेची पाहणी केली असता याची तक्रार .जिल्हाधिकारी,आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे सदर प्रकरणांबाबत तक्रार करण्याचे व पाठपुरावा करण्याचे सांगितले .
१८८६ साली स्थापन जिल्हा परिषद केंद्र शाळा चिमठाणे मुलांच्या शाळेला कुलूप शाळेवर वटवाघुळाचे विघ्न..
