झुंजार क्रांती वृत्तपत्राची दखल चिमठाणे जिल्हा परिषद शाळेला शिक्षण विस्तार अधिकारी यांची भेट महिन्याअखेर शाळेची डागडूज्जी करून मूळ शाळेत मुलांचे स्थलांतर .

झुंजार क्रांती न्युज पोर्टेल -शिंदखेडा तालुका प्रतिनिधी -प्रविण भोई

झुंजार क्रांती वृत्तपत्राची दखल चिमठाणे जिल्हा परिषद शाळेला शिक्षण विस्तार अधिकारी यांची भेट महिन्याअखेर शाळेची डागडूज्जी करून मूळ शाळेत मुलांचे स्थलांतर …. चिमठाणे जिल्हा परिषद शाळेला कुलूप व वटवाघुळांचे विघ्न अशा आशयाचे झुंजार क्रांती या वृत्तपत्राने बातमी प्रकाशीत केल्यानंतर संबंधित अधिकारी हे खड बडून जागे झाले. व तात्काळ शिक्षण विस्तार अधिकारी यांनी संबंधित जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.सविस्तर वृत्त -= सदर चिमठाणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा वटवाघुळाच्या कारणाने स्थलांतरित करण्यात आली होती. शिक्षक कर्मचारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कुठलीच परवानगी न घेता शाळेला कुलूप लावण्यात आले होते. सदरील पालक गणेश भोई यांनी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील (सोनू फौजी) यांच्याकडे याची तक्रार केली. सोनू फौजी यांनी पत्रकारांना घेऊन सदर शाळेची पाहणी केली असता सदरील शाळा ही वटवाघुळाच्या त्रासाने आम्ही शाळेचे स्थलांतर केले असे शिक्षक कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र संबंधित शाळेच्या स्थलांतराबाबत पत्र व्यवहार झालेला दिसून आला नाही. याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय आपण असा स्वतः निर्णय घेऊ शकत नाही अशी समज गट शिक्षण धिकारी यांनी मुख्याध्यापकांना दिली. मूळ शाळेत मुलांचे स्थलांतर -अगोदर ज्या जिल्हा परिषद च्या शाळेत मुलांचे वर्ग भरवले जात होते. आता त्याच शाळेत महिन्याअखेरीस शाळेची डागडुजी ग्रामपंचायत मार्फत करून देण्याचे आश्वासन चिमठाणे सरपंचांनी माजी.उपसभापती दरबारआबा गिरासे यांनी केले आहे.जेणेकरून वटवाघूळाचा बंदोबस्त होईल वर्ग भरवले जातील.अशी माहिती मुख्याध्यापिका वंदना खैरनार यांनी दिली…पाहणीच्या वेळेस -शिक्षण विस्तार अधिकारी श्री.कैलास पाटील, माजी.उपसभापती दरबारआबा गिरासे, पालक -गणेश भोई, जयपालसिंग गिरासे, शाळा समिती अध्यक्षांसह मुख्यध्यापिका वंदना खैरनार आदी उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!