*मानवता सेवाभावी संस्थे मार्फत विद्यार्थींनींना शिवणक्लास प्रशिक्षणा साठी मोफत प्रवास*झुंजार क्रांती न्युज प्रतिनिधी विजय परदेशी प्रकाशा
प्रकाशा = शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रकाशा येथील मानवता सेवाभावी संस्थेकडून शिवण क्लास शिकणाऱ्या विद्यार्थिनींना कोरीट पासुन ते प्रकाशा पर्यंत मोफत प्रवास देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविले असुन ॲपे रिक्षाद्वारे हा प्रवास होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अजीज खाटिक व सचिव गफ्फार मण्यार यांनी सांगितले कोरीट येथुन प्रकाशा या ठिकाणी दररोज १०ते १२ विद्यार्थिनी शिवण क्लासचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात त्यांना २६ जानेवारी पासुन ॲपेरिक्षा द्वारे मोफत प्रवास देणार असल्याचे संस्थेच्या बैठकीत ठरविण्यात आले असता त्याचा शुभारंभ नुकताच जन शिक्षण संस्थेच्या संचालिका कोकीला बाई देवराम निकुंभ यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी राजु लोहार, रविंद्र कोळी, इरफान जहागिरदार उपाध्यक्ष जावेद मन्सूरी, इरफान शेख, पत्रकार संजय सोनवणे, आदी उपस्थित होते या मोफत प्रवासाचे सर्वत्र कौतुक होत आहे….

Registration on jili666register was a breeze – quick and simple. Ready to play some new games. Easy peasy lemon squeezy. Sign up here: jili666register