*प्रकाशा येथील ग्रामस्थान कडून स्व. अजित दादा पवार यांना वाहली भावपूर्ण श्रद्धांजली*

*प्रकाशा येथील ग्रामस्थान कडून स्व. अजित दादा पवार यांना वाहली भावपूर्ण श्रद्धांजली*

झुंजार क्रांती न्युज प्रतिनिधी विनोद शिंदे प्रकाशा शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे आज दि. ३०/१/२०२६ रोजी गांधी चौक येथे सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रकाशा येथील सर्व ग्रामस्थ तसेच नागरिक व कार्यकर्ते यांनी स्व. अजित दादा पवार यांना सामुहिक श्रद्धांजली दिली दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन राहुन भावपूर्ण श्रद्धांजली दिली तसेच दादांचा विषयी नागरिक वक्तव्य करत असतांना आतुन भावुक होतांना दिसु लागले होते दादा हे मुंबई हुन बारामती येथे प्रवास करत असतांना विमान दुर्घटनेत त्यांच्या अपघात झाला व त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला तसेच दादा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष होते त्यांनी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री पद हि एकुण ६ वेळा स्विकारली व जनतेची सेवा केली त्यांत त्यांनी लोकांच्या हृदयात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली त्यांना लोक नेहमी कामाचा माणून म्हणुन ओळखत होते आणि आज या दुर्देवी घटनेने महाराष्ट्रा सह संपूर्ण देश दादांच्या या निधनाने शॉक झाले या प्रसंगी पवार कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले त्यात प्रकाशा येथील सर्व ग्रामस्थ व हितचिंतक यांनी आप आपल्या मते कृतज्ञता व्यक्त केली…

2 thoughts on “*प्रकाशा येथील ग्रामस्थान कडून स्व. अजित दादा पवार यांना वाहली भावपूर्ण श्रद्धांजली*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *