‘मराठी आमची माय, आमचा अभिमान’ विषयावरील निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
धुळे | प्रतिनिधी (डी. एम. आखाडे)राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन (मराठी भाषा विभाग) आणि मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी आमची माय, आमचा अभिमान’ या विषयावरील निबंध स्पर्धेचे आयोजन ईंदाई देवी माध्यमिक विद्यालय, जवाहर कॉलनी, साक्री रोड, धुळे येथे उत्साहात पार पडले.या स्पर्धेत ४५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मराठी भाषा, तिचे महत्त्व, संस्कृती आणि जतनाची गरज यावर प्रभावीपणे आपले विचार मांडले. स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व वही, तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर एक वही देण्यात येणार आहे.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. एम. आखाडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. व्ही. शिवदे सर, तसेच व्ही. डी. मोहने सर, वाय. व्ही. देवरे सर, एस. एम. देसले सर, एस. जे. जाधव सर, एस. एस. साळुंखे सर आणि एम. एस. मुळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.मराठी भाषेप्रती विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, अभिमान आणि जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
