झुंजार क्रांती न्युज प्रतिनिधी विजय परदेशी प्रकाशा
शहादा तालुक्यातील प्रकाशा या गावी आदिवासी समाज सुधारणा संघटने तर्फे प्रकाशा येथील सर्व पत्रकार बंधूना सत्कार समारोह साठी आमंत्रित करण्यात आले तसेच हा सत्कार समारोहचा कार्यक्रम आई मनिषा पुरी देवी च्या प्रांगणात करण्यात आला सर्व प्रथम पत्रकार सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलित करुन पुष्प हार ने पूजा करण्यात आले आणि प्रकाशा येथील सर्व पत्रकार बंधूंना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी प्रकाशा येथील आदिवासी समाज सुधारणा टीम भवानी हाट्टी यांच्या कडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ, व युवा आणि नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान नागरिकांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की समाजाचा आणि गावाचा विकास होणे या माघे मुख्य भूमिका म्हणजे जनतेचा चौथा स्तंभ पाठी मागे असणे खुप गरजेचे आहे कारण गल्ली पासुन तर दिल्ली पर्यंत आपल्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळुन देण्याचा काम हा फक्त जनतेचा चौथा स्तंभ करतो आणि तो जनते साठी दिवस व रात्री एक करुन आपले कर्तव्य पूर्ण करतो असे ही स्पष्ट वक्तव्यात सांगण्यात आले या वेळी आदिवासी समाज हा शिक्षणा पासुन वंचित आहे काळा अभावी समाजाने शिक्षणा कडे आपले लक्ष केंद्रीत केले पाहिजे व व्यसना पासून दुर असले पाहिजे असे संभाषणात सांगण्यात आले तसेच कार्यक्रमाला सुत्र संचालन आंबालाल भिल यांनी केले व आभार सर्व पत्रकार बंधूनी मानले व कार्यक्रमाला पूर्ण विराम देण्यात आला….

Really impressed with the graphics and the overall gameplay. It is super addictive in a good way. I am spending way too much time on phnustargameonline!