*भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏नंदुरबार जिल्हा तलाठी संघाच्या वतीनेतहसील कार्यालय, शहादा येथील नायब तहसीलदार (महसूल)श्री. प्रकाश मल्हारी पानपाटील (रावसाहेब

🙏 *भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏नंदुरबार जिल्हा तलाठी संघाच्या वतीनेतहसील कार्यालय, शहादा येथील नायब तहसीलदार (महसूल)श्री. प्रकाश मल्हारी पानपाटील (रावसाहेब)यांचे दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी अल्पशा आजाराने झालेले दुःखद निधन ऐकून मन सुन्न झाले आहे. ही बातमी केवळ महसूल विभागासाठीच नव्हे, तर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यासाठी अत्यंत वेदनादायी व हृदयविदारक आहे.रावसाहेब पानपाटील हे महसूल विभागातील एक आदर्श अधिकारी होते. शांत, संयमी, सौम्य व कर्तव्यदक्ष स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता. उन्हाळ्याच्या तीव्रतेत शहादा येथे बदली होऊन आल्यानंतरही, निवडणूक काळात मतदान केंद्रांच्या पाहणीसारखी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी अतिशय निष्ठेने पार पाडली. मूत्रपिंडाच्या दीर्घ आजाराने ग्रासलेले शरीर असतानाही, कोणतीही तक्रार न करता, मोटारसायकलवरून धूळखात व उन्हात फिरत त्यांनी कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. प्रकृतीच्या त्रासाकडे दुर्लक्ष करूनही त्यांचा उत्साह व समर्पण कधीच कमी झाले नाही – हे त्यांच्या निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे.रावसाहेब हे नेहमी शांत व सौम्य बोलणारे होते. कुणाबद्दलही वाईट बोलणे किंवा कुणाचे मन दुखावणे त्यांना मान्य नव्हते.आयुष्यभर महसूल विभागात प्रामाणिक, निःस्वार्थी व पारदर्शी सेवा बजावून त्यांनी अनेकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले. त्यांच्या सहवासात असणाऱ्या प्रत्येकाला त्यांचा साधेपणा व हृदयस्पर्शी स्वभाव नेहमी आठवेल.मध्यंतरीच्या एका परदेशी रावसाहेब यांच्या सोबत संवादात त्यांनी अगदी सहजतेने म्हटले होते – “माझं काही खरं नाही… संघटनेच्या माध्यमातून आणि आपल्या वैयक्तिक ओळखीने माझ्या मुलांची लाईन व्यवस्था बरोबर करून द्यायची.” हे शब्द आठवले की डोळे पाणावतात. एका कर्तव्यनिष्ठ पित्याची व निरोगी भावनांची झलक त्यात दिसते.अचानक असा विरह सहन करणे कठीण आहे.जिवंतपणी समोरासमोर चांगले-वाईट स्पष्ट बोलण्याची त्यांची खंबीर भूमिका आणि तसेच प्रामाणिक आयुष्य जगण्याचा आदर्श आजही आम्हाला प्रेरणा देत राहील.महसूल विभागाने एक शांत, संयमी व निष्ठावान अधिकारी गमावला आहे. *नंदुरबार जिल्हा तलाठी संघाच्या वतीने त्यांच्या निष्ठावंत सेवेला विनम्र अभिवादन!* रावसाहेब, आपण नेहमी आमच्या हृदयात व आठवणींत जिवंत राहाल.🕯️ *भावपूर्ण श्रद्धांजली* 🕯️🌺 परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व दुःखी कुटुंबीयांना व सहकारी महसूल परिवाराला हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो. 🌺🙏 *नंदुरबार जिल्हा तलाठी संघ*🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!