5 जानेवारीला जिल्हास्तरीय लोकशाही दिन- डॉ. मित्ताली सेठी
नंदुरबार, दिनांक 31 डिसेंबर, 2025 (जिमाका वृत्त) :जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे जानेवारी, 2026 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 05 जानेवारी, 2026 रोजी दुपारी 01-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर आणि पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कामासबंधी वैयक्तिक तक्रारी/निवेदन सादर करावयास असल्यास प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या लोकशाही दिनात दाखल कराव्यात. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल तक्रार/निवेदन यावर समाधान न झाल्यास प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार/निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून दाखल करावेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
