अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी(कम्पा.न.६८) येथील मंजूर झालेली १७ नर्सरीची कामे ३० किलोमीटर दूर मोलगी येथे बेकायदेशीरपणे स्थलांतरित करण्यात येवू नये अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसेनेचे शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी केली आहे. या संदर्भात शिवेसेनेचे शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर निवेदन दिले आहे कि,अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी व पिंपलखुटा परिसरासाठी शासनाने महत्वपूर्ण निधी मंजूर केला आहे, मात्र प्रशासकीय स्तरावर होत असलेल्या बदलांमुळे स्थानिक आदिवासी बांधवांवर मोठा अन्याय होत आहे. त्याबाबतचे सविस्तर मुद्दे…१)निधी व मंजूर कामांचा तपशील:-जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन २०२५-२०२६ अंतर्गत ‘२२२५-महसुली’ या लेखा शिर्षांतर्गत मेवासी वन विभाग, तळोदा यांना अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी (कम्पा.नं.६८) आणि पिंपलखुटा (कम्पा.नं.५८) येथे मध्यवर्ती रोपमळे व बी-बियाणे तयार करण्यासाठी सुमारे २ कोटी १० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये वडफळी (कम्पा.नं.६८) येथे १७ नर्सरींची कामे प्रस्तावित आहेत.२) कामाचे बेकायदेशीर स्थलांतर:-वडफळी येथे कामे होणे अपेक्षित असताना, मेवासी वन विभाग तळोदा येथील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबींचे चुकीचे दाखले देऊन, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही कामे वडफळीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या मोलगी (सर्व्हे नं. १६८) येथे स्थलांतरित करण्याचा घाट घातला आहे. हे संपूर्ण नियोजन बेकायदेशीर असून स्थानिक जनतेच्या हक्कावर गदा आणणारे आहे.३) स्थानिक रोजगारावर होणारा परिणाम:- दुर्गम भाग: वडफळी आणि त्याभोवतीचा परिसर हा शंभर टक्के आदिवासी बहुल आणि अतिशय दुर्गम आहे.* स्थलांतराचा प्रश्न: स्थानिक भागात रोजगाराची साधने नसल्याने येथील बांधवांना परराज्यात कामासाठी जावे लागते. * हक्काचा रोजगार: शासनाने हा निधी स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठीच दिला आहे.जर ही कामे ३० किमी लांब मोलगी येथे गेली, तर वडफळी परिसरातील गोरगरीब जनता रोजगारापासून वंचित राहील.मागणी व इशारा:- वडफळी (कम्पा.नं.६८) येथील १७ नर्सरींची कामे मूळ मंजुरीनुसार त्याच ठिकाणी करण्यात यावीत.ती कामे कोणत्याही परिस्थितीत मोलगी येथे हलवण्यात येऊ नयेत.जर ही कामे बेकायदेशीररीत्या मोलगी येथे सुरू करण्यात आली, तर शिवसेना व स्थानिक हजारो नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी म.उपवनसंरक्षक सो.मेवासी वन विभाग, तळोदा येथील संबंधित अधिकाऱ्यांची राहील.तसेच गरज पडल्यास आम्ही या अन्यायाविरुद्ध मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करू असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी दिला आहे. निवेदनावर मनलेश जायसवाल यांच्यासह युवा सेनेचे उप जिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे जयसिंग ठाकरे, लक्ष्मण पवार, अशोक वसावे सुभाष सोनवणे, प्रा.विजय गायकवाड,कृष्णा ठाकरे,संतोष गिरासे,मनोज पाथरवट,जगदीश ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी(कम्पा.न.६८) येथील मंजूर झालेली १७ नर्सरीची कामे ३० किलोमीटर दूर मोलगी येथे बेकायदेशीरपणे स्थलांतरित करण्यात येवू नये अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसेनेचे शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी केली आहे

Anyone else tried 888phpbet? I’m looking for a good new spot to play. Is it legit? Let me know! 888phpbet
Yo, 939game, it’s a great site. A lot of people playing and winning big. Check it out for a fun gaming trip. Worth some time! 939game
Gotta get that 9s app. I bet it is cool. Easy to download and all you need. I heard that a lot about them. 9s