दत्ताराम दळवी ” जीवन गौरव ” पुरस्काराने सन्मानित !

झुंजार क्रांती न्युज,दत्ताराम दळवी ” जीवन गौरव ” पुरस्काराने सन्मानित !———————————-मुंबई :- आपण ज्या समाजात राहतो, वावरतो त्या समाजाचे आपण देणेकारी आहोत. अशा सदभावनेने गेली 50 वर्ष दत्ताराम दळवी समाजाची, गावाची, न्यातिबंधुची, गरजू व पीडितानाची वेगवेगळ्या प्रकारे विविध क्षेत्रातून सेवा करीत आहेत. गरजू, अडचणीत असलेले गरिबाना ते नेहमी मदत करीत आलेले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःचे साप्ताहिक – प्रकट महाराष्ट्र सुरु करून त्याद्वारे अनेक विषयावर लेखन करून पीडिताच्या समस्यावर प्रकाश टाकलेला आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन ” आम्ही वडाळा पूर्वकर ” या संस्थेने दत्ताराम दळवी यांना वडाळा विभाग काँग्रेसच्या अध्यक्षा- अक्षता मोहिते यांच्या हस्ते ” जीवन गौरव ” पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहांन दिलेले आहे. यावेळी दत्ताराम दळवी यांच्या समवेत इतर क्षेत्रातही उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजसेवाकाचा सन्मान या संस्थेने केलेला आहे. आम्ही वडाळा पूर्वकर या संस्थेने पनवेल मधील नेरे गावातील वृद्धाश्रमाल भेट देऊन वृद्धना त्यांच्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू भेट दिलेल्या आहेत, अनेक शाळांमधूनही शालोपयोगी वस्तूंचे वाटप करून शैक्षणिक सहाय्य केलेले आहे. स्वावलंबी आणि परावलंबी होताना अपयश आलेतर अनुभव घ्यायचा ज्ञान मिळवायचे, कौशल्य प्राप्त करायचे हे विचार आणि कृती त्या अपयशावरील जालीम उपाय आहे. कारण ” अपयशातून यश जन्माला येते, प्रत्येक दिवसाला रात्रीचा शाप असतो, सुखाला दुःखाचा तर सावलीला उन्हाचा त्रास असतो, मंद वाऱ्याला वादळचा तर आनंदाला उदासीनतेचा शाप असतो, बहराला पानझडीचा तर बालपणाला वार्धक्याचा शाप असतो, सामाजिक कार्य करणाऱ्यांना ला विरोधकांचा त्रास असतो ” असा सर्वच क्षेत्रातून बराच त्रास सहन करून फक्त समाजकार्य करीत राहणारी ” आम्ही वडाळा पूर्वकर ही संस्था समाजोपयोगी कामे करीत असताना, संस्थेला कुणाचीही आर्थिक मदत नसताना वडाळा येथील स्मशानभूमीतील कामगारांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यासाठी स्मशानभूमीतच कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा यथोचित सन्मान केला आहे. आम्ही वडाळा पूर्वकर संस्थेने विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर पत्रकार NDTV वाहिनीचे – सुधाकर काश्यप्य, संगीतकार – युसुफ दरबार, डॉ. मेखला नाईक ( नेत्रतज्ञ् ), सुफियान बानू ( नगरसेवक ), असुंता डिसोझा, हेमलता सदाशिवम, फादर ब्रास्टीन, मिताली तांबे, प्रकाश कनावजे, कृष्णाजी कोल्हे शिवाजी गावडे, रमेश आव्हाड ( साहित्यिक), आनंद प्रभू, चंद्रकांत जाधव, कोठारी मॅडम व मोईनउद्दीन अब्बास ( स्मशान भूमी जेष्ठ कर्मचारी) इ. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अलंकारिक शब्दात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी निवेदक उमेश सावंत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!