बेंजो- सूर ताल आयुष्याचे ” या चौथ्या पुस्तकाचे मोठ्या उत्साहात प्रकाशन


झुंजार क्रांती न्युज,

” बेंजो- सूर ताल आयुष्याचे ” या चौथ्या पुस्तकाचे मोठ्या उत्साहात प्रकाशन.

मुंबई :– आम्ही वडाळा पूर्वकर संस्थेच्या ८ व्या वर्धापनदीना निमित्त “जीवन गौरव पुरस्कार” तसेच “समाज रत्न पुरस्कार” वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बुलबुल वादक, सुप्रसिद्ध लेखक, कवी सामाजिक कार्यकर्ते, श्री. शिवाजी सुलोचना सत्यवान फणसेकर लिखित ब्यांजो या विषयावर आधारित वादक कलाकार यांच्या आयुष्यावरील महाराष्ट्रातील पहिले प्रकाशित होणारे संशोधन केलेले पुस्तक ज्याचा भव्य प्रकाशन सोहळा चित्रपट सुष्ट्रीतील जेष्ठ बेंजो वादक संगीतकार युसुफ दरबार, महाराष्ट्रातील जेष्ठ कच्ची बाजा सम्राट इब्राहिम दाऊदभाई यांच्या हस्ते वडाळा येथील मुंबई पब्लिक स्कूल येथे नुकताच पार पडला. यावेळी जेष्ठ पत्रकार सुधाकर काश्यप्य, डॉ. मेखला नाईक, सामाजिक कार्यकर्त्यां असुंता डिसोझा, हेमलता सदाशिवम, फादर ब्रास्टीन, सा. प्रकट महाराष्ट्र चे संपादक दत्ताराम दळवी, जेष्ठ क्रीडा प्रशिक्षक प्रणिल आचरेकर, आदर्श शिक्षिका मिताली तांबे, साहित्यिका वर्षांताई भाबल, गिरगांव चा राजा गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कनावजे नगरसेवक सुफियान बानू, नगरसेविका कल्पेशा कोठारी, आदर्श शिक्षक कृष्णाजी कोल्हे, जेष्ठ शिवसैनिक शिवाजी गावडे, संगीतकार राजेश चिखलकर, विजय रणदिवे, जयदीप गावकर, सामाजिक कर्यकर्त्या अक्षता मोहिते, रेश्मा शहा, राजा सिंग सिंग वाले, विकास कदम, तुषार कांबळे, सुभाष कदम इ. मान्यवर उपस्थित होते.
आम्ही वडाळा पूर्वकर या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविलेले आहेत. पनवेल मधील नेरे गावच्या वृद्धाश्रमातील वृद्धाना त्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे वाटप केलेले आहे. बालसुधारगृह, महिला आश्रम यांचीही या संस्थेने दखल घेतलेली आहे. आजपर्यंत महाराष्ट्रतच नव्हे तर देशभरातही ” कुणीही स्मशानभूमीतील कामगारांची दखल घेलेली नाही. स्मशानभूमीतील कामगारांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यासाठी स्मशानभूमीतच कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा यथोचित सन्मान करणारी आम्ही वडाळा पूर्वकर ही एकमेव संस्था आहे. ” आम्ही वडाळा पूर्वकर ” ही संस्था समाजोपयोगी कामे करीत असताना कुणाचीही आर्थिक मदत नसताना सर्व कार्यकर्ते स्वखर्चाने समाजातील विविध क्षेत्रात काम करून जनतेला हातभार लावत आहेत.
शिवाजी फणसेकर यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अनेक गहण समस्या सोडवून सर्वांना न्याय मिळवून देण्याच प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची वाहवा सर्वच क्षेत्रातून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!