FDAची सौम्य कारवाई पुन्हा चर्चेत; जैन स्वीटमध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थ सापडूनही दुकानदार मोकळा

FDAची सौम्य कारवाई पुन्हा चर्चेत; जैन स्वीटमध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थ सापडूनही दुकानदार मोकळा – जनतेच्या आरोग्याशी सरळ खेळकाही महिन्यांपूर्वी शहरातील एका हॉटेलमध्ये जेवणात किडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेनंतर संबंधित कुटुंबातील सर्व सदस्यांना विषबाधा होऊन रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र, एवढ्या गंभीर घटनेनंतरही अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केवळ ६,हजार रुपयांचा दंड ठोठावून हॉटेल मालकाला मोकळे केले होते. या कारवाईवर त्यावेळीच नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून,शहादा शहरातील जैन स्वीट या दुकानात मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले असल्याचे उघडकीस आले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत दुकानदारांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुकान दाराकडून अरेरावी झाल्याचं पण बोलले जात आहे मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्री म्हणजे थेट जनतेची फसवणूक असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.या प्रकरणी संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असूनही, अन्न व औषध प्रशासनाकडून अपेक्षित अशी कठोर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे. केवळ औपचारिक तपासणी, कागदोपत्री नोंदी किंवा किरकोळ कारवाई करत दुकानदारांना सोडून देण्याचा प्रकार पुन्हा घडत असल्याचा आरोप होत आहे.विशेष म्हणजे, यापूर्वी विषबाधेसारखी गंभीर घटना घडूनही FDA ने कडक पावले उचलली नसल्यामुळेच आज पुन्हा अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. फक्त दंड आकारून प्रकरण दाबण्याची पद्धत नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून,“FDA हे जनतेच्या आरोग्यासाठी आहे की निष्काळजी दुकानदारांना वाचवण्यासाठी?” असा थेट सवाल उपस्थित होत आहे.नागरिकांकडून आता संबंधित दुकानदारांवर गुन्हा दाखल करणे, दुकानाचा परवाना रद्द करणे आणि कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेंच शहरातील सर्व हॉटेल व खाद्य पदार्थ विक्री दुकानंनाची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून करण्यात येत आहे झुंजार क्रांती न्यूज साठी कैलास सोनवणे शहादा

3 thoughts on “FDAची सौम्य कारवाई पुन्हा चर्चेत; जैन स्वीटमध्ये मुदतबाह्य खाद्यपदार्थ सापडूनही दुकानदार मोकळा

  1. Alright, so I checked out ki888 after hearing some buzz. Seems like a decent spot if you’re looking for some casual fun. Nothing groundbreaking, but solid enough to kill some time. Check it out here ki888 and see for yourself.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *