दंगा पेटविणारी आणि वारंवार शासकीय आदेशांचे उल्लंघन करणारी टोळी नंदुरबार जिल्हयातून हद्यपार

दंगा पेटविणारी आणि वारंवार शासकीय आदेशांचे उल्लंघन करणारी टोळी नंदुरबार जिल्हयातून हद्यपार*नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने शहादा पोलीस ठाणे हद्यीत कार्यरत असलेल्या एका गुन्हेगारी टोळीविरुध्द मोठी कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित इसमांची गुन्हेगारी पार्श्वभुमीचा आढावा घेवून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये खालील 9 इसमांना नंदुरबार जिल्हयाचे हद्यीतून 2 वर्षांचे कालावधीसाठी हद्यपार (Externment) करण्याचे आदेश पारित केले आहेत.हद्यपार करण्यात आलेले इसमःसुशिलकुमार जहांगीर पावरा (टोळीप्रमुख), (अध्यक्ष बिरसा फायटर्स) वय 40 वर्ष, रा.होळ उंटावद, शहादा, जि. नंदुरबार, रोहीदास गेमजी वळवी वय 60 वर्ष, रा. लोय पिंपळोद, ता.जि. नंदुरबार, राहुल श्रीराम कुवर, (वकील) वय 39 वर्ष, रा. तिसी, ता. जि. नंदुरबार, रविंद्र रंजित वळवी, वय 52 वर्ष, रा. दुधाळे शिवार, ता. जि. नंदुरबार, पंकज राजेंद्र वळवी, वय 31 वर्ष, रा. जुना बैल बाजार, ता. जि. नंदुरबार, गोपाल रमेश भंडारी वय 34 वर्ष, रा. शहाणा, ता. शहादा, जि. नंदुरबार, अजय मधु वळवी, वय 33 वर्ष, रा. टोकरतलाव, ता. जि. नंदुरबार, दिलीप नभु मुसळदे, वय 32 वर्ष, रा.टूकी, ता. शहादा, जि. नंदुरबार, सतिष पांडु ठाकरे, वय 40 वर्ष, रा. फत्तेपूर, ता. शहादा, जि. नंदुरबार सदर इसमांविरुध्द शहादा पोलीस ठाणे तसेच इतर ठिकाणी टोळी जमवून मारामारी करणे, धमकी देणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, तसेच सार्वजनिक शांततेस बाधा आणणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे पालन न करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. हे सर्व इसम संघटीत टोळीच्या स्वरुपात कार्यरत राहून स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करत होते. नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र. नं. 583/2025 या गुन्हयात जो मोठा दंगा झाला त्यात अतिशय गंभीर परिस्थिती उद्भवली होती. तसेच या टोळी प्रमुख व काही सदस्यांनी पसरविलेल्या खोटया अफवांमुळे व चिथावणीमुळे अनेक आदिवासी तरुणांवर गुन्हे दाखल होवुन त्यांना अटक देखील झाली होती. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हयात आदिवासी विरुध्द बिगर आदिवासी असा प्रचंड तणाव निर्माण झाला होता व त्यामुळे सामाजिक एकतेला गंभीर धोका निर्माण झाला होता. तसेच सदर टोळीप्रमुख सुशिलकुमार पावरा विरुध्द 2 शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा अतिशय गंभीर गुन्हा (POCSO) देखील रत्नागिरी येथे दाखल होता. या पार्श्वभुमीवर, संबंधित इसमांच्या वर्तवणुकीमुळे सार्वजनिक सुव्यवस्था वारंवार धोक्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हद्यपार कारवाई करणे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले. सदर आदेशानुसार वरील सर्व इसमांना नंदुरबार जिल्हा हद्यीतून 2 वर्षांसाठी हृद्यपार करण्यात आले असून, या कालावधीत संबंधित हद्यीत प्रवेश करण्यास त्यांना सक्त मनाई करण्यात आलेली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द कायदयानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. “जिल्हा पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटीबध्द असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

4 thoughts on “दंगा पेटविणारी आणि वारंवार शासकीय आदेशांचे उल्लंघन करणारी टोळी नंदुरबार जिल्हयातून हद्यपार

  1. 18Jili is pretty popular right now. Got a decent selection of slot games, if you’re into that kinda thing. Worth a look, maybe?18jili

  2. 666JL – Anyone tried their mobile app? Heard it’s pretty smooth. Makes gaming on the go super easy! Let me know if it’s true!666jl

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *