बुधावल ता तळोदा येथे जिल्हा परिषद शाळेत *राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान अंतर्गत मुलींना स्वयंम रक्षणाचे प्रशिक्षण. देण्यात आले*

बुधावल ता तळोदा येथे जिल्हा परिषद शाळेत *राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान अंतर्गत मुलींना स्वयंम रक्षणाचे प्रशिक्षण. देण्यात आले* मुलींमध्ये आत्मविश्वास धैर्य चिकाटी व धाडसी वृत्ती व स्व संरक्षणाची क्षमता वाढवण्याचे उद्देशाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या वतीने राज्यभर राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण राबविण्यात येत आहे, या अभियानांतर्गत तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गणेश बुधावल येथे 26 फेब्रुवारी रोजी विद्यार्थींसाठी आत्महत्या प्रशिक्षण घेण्यात आले विद्यार्थिनींना स्वतःचे संरक्षण कसे करावे व विविध डावपेच योगाचे धडे तसेच मुलींमध्ये धाडसी वृत्ती कशी जागृत होईल याबद्दल विद्यार्थिनींना संगणक शिक्षिका शालिनी देसले यांनी मार्गदर्शन केले. आत्मविश्वास वाढवण्यास व संकट वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे व निर्णय क्षमता विकसित होण्यासाठी या प्रशिक्षणाची मदत होत आहे या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व उपस्थित होते. हे मार्गदर्शन विद्यार्थिनींना खूप मोलाचे ठरले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 233 शाळा मध्ये हे प्रशिक्षण राबविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!