परिसरात चोरट्यांच्या धुमाकूळ दलवाडे शेतशिवारात पंधरा सिमेंट पोल वरून ॲल्युमिनियम तार चोरट्यानकडून लंपास या अगोदर अशाच प्रकारच्या साथ ते आठ चोऱ्या पोलीस प्रशासन अनभिन्न …
चिमठाणे येथील दलवाडे प्र. सो येथील दोंडाईचा सोनगीर रस्त्याचा लगत चिमठाणे विजउपकेंद्रजवळच शेतशिवारात वेगवेगळ्या शेतातून एकाच लाईनीतून एक-दोन नाही तर एकूण पंधरा सिमेंट पोलवरून चोरट्यांनी एका रात्रीत पंधरा पोलावरून शेतात असलेल्या ॲल्युमिनियम तार कट करून तार चोरून नेल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली आहे.त्याची किंमत पस्तीस ते चाळीस हजाराच्या आसपास आहे.या अगोदर एक ते दीड महिन्यात सात ते आठ अश्याच मोठ्या तार चोरीच्या घटना घडल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.राज्यात दुष्काळाचे सावट असताना शेतकरी विहिरीतून थोडे फार आहे तेव्हढे पिकाला पाणी भरून लागलेला खर्च तरी थोडाफार निघेल या आशेवर आहे मात्र चोरटे शेतकऱ्यांना तेव्हढे सुद्धा करू देत नाही.निसर्ग पाणी पाडत नाही, सरकार तुटपुंजी मदत करते, चोर शेतातून चोऱ्या करतात वस्तू चोरून नेत आहेत मग शेतकऱ्यांनी करायचे काय?.सध्या चिमठाणे परिसर चोऱ्यांचे माहेरघर बनले आहे की काय?परिसरात चोरट्यांनी चोरीचा सपाटा लावला आहे . पाण्याची मोटारची चोरी , मोटर सायकल चोरी, केबल चोरी, ॲल्युमिनियम तार चोरी,वाळू चोरी, जनावरे चोरी,अशा विविध चोरीनी चिमठाणे परिसरात चोरट्यानी दहशद लोकांमध्ये निर्माण केली आहे मात्र यांना आवर घालायला कोणी वाली नाही पोलीस प्रशासन अपयशी ठरते आहे की काय?. चिमठाणे गावात पोलीस स्टेशन असून सुद्धा चोरीच्या वारंवार घटना घडत आहेत पोलीस स्टेशन आहे मात्र पोलीसच नाहीत मग चोरट्याना आवर घालेल कोण?ज्यां पोलिसांना पदभार आहे पोलीस स्टेशनचा मग त्यांचे नेमके कार्य काय ?असा प्रश्न चिमठाणे परिसरातील लोकांना पडला आहे शेतकऱ्यांनी पाण्याची मोटार चोरीच्या आता पर्यंत शेकडो पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्या असतील पोलिसांना वारंवार तक्रारी केल्या अर्ज दिले मात्र तपासाचा कुठलाच छळा लागत नसल्याने तक्रारीचा कुठलाच फायदा होत नसल्याने शेतकऱ्यांनी तक्रारी करणे सोडले …
