माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. वकील आबा पाटील व मा. मार्केट कमिटी अध्यक्षा सौ. संध्याताई पाटील यांच्या हस्ते वैंदाणे येथे गणपती आरती
नंदुरबार प्रतिनिधी – ईश्वर पिंपळे
वैंदाणे : वैंदाणे गावात दरवर्षी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या उत्सवाच्या अनुषंगाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती करण्याचा मान दिला जातो.
यावर्षी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. वकील आबा पाटील व त्यांच्या पत्नी, मा. मार्केट कमिटी अध्यक्षा व सदस्या सौ. संध्याताई वकील पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.
यावेळी मा. वकील आबा पाटील यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यात कुठेही अन्याय-अत्याचार झाल्यास नागरिकांच्या सुख-दुःखात आपण नेहमी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू. तसेच वैंदाणे गावातील ग्रामस्थांनी एकजूट व सार्वजनिक एकोपा कायम ठेवत गणेशोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकीचे उदाहरण निर्माण केले आहे. गावातील हा एकोपा व उत्सवातील सहभाग इतर गावांसाठीही आदर्श ठरणारा आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाप्रसंगी विकास सोसायटीचे चेअरमन श्री. भास्कर पाटील, शिवसेना सामाजिक कार्यकर्ते वकील पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भटू आण्णा आखाडे, सरपंच प्रवीण पवार, शिवसेना शाखाप्रमुख श्री. सुरेश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. राकेश पाटील, गुलाब पाटील, अनिल पागारे, सुनील पाटील, राकेश भलकार, जगदेव पाटील, प्रवीण पाटील, संदीप निकम, मधुकर पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील तसेच समस्त ग्रामस्थ व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
