माता रमाईंचा त्याग समाजासाठी सदैव प्रेरणादायी; शहाद्यात १२८ वी जयंती उत्साहात साजरी.शहादा,दि.०७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात खंबीरपणे साथ देणाऱ्या आणि दीन-दलितांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या ‘त्यागाची मूर्ती’ माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती शहादा येथील सिद्धार्थनगर (कुकडेल) भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिमा पूजन आणि बुद्ध वंदनाकार्यक्रमाची सुरुवात माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी परिसरातील बौद्ध उपासक आणि उपासिकांनी एकत्र येत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी मिळून सामूहिक बुद्ध वंदना आणि धम्म वंदना ग्रहण केली ज्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते.या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे माता रमाईंच्या संघर्षावर आधारित गायनाचा कार्यक्रम होता.उपस्थित बौद्ध उपासिका आशाबाई कुवर, सुनंदाबाई मोघे, हिराबाई पवार, आरतीबाई सामुद्रे, रंजना कुवर, कविता कुवर, योगिता बैसाणे, वंदना बैसाणे, रोहिणी जगदेव, भारती जगदेव, अरूणा जगदेव, सिंधुबाई कुवर, रेखाबाई कुवर, लक्ष्मीबाई अहिरे, कल्पना कुवर, सुमनबाई भालेराव, नंदिनी कुवर, सविताबाई अहिरे आणि विमल कुवर या महिलांनी आपल्या सुरांनी माता रमाईंचा जीवनप्रवास उलगडला. त्यांच्या गीतांतून रमाईंचे कष्ट आणि डॉ. बाबासाहेबांना त्यांनी दिलेली साथ याचे भावूक वर्णन करण्यात आले.या मंगलप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक नरेंद्र कुवर आणि नवनिर्वाचित नगरसेवक मुनेशचंद्र जगदेव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या व्यक्तींचा हा गौरव युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल कुवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, राजू अहिरे, संजय कुवर, गणेश कुवर, राहूल बैसाणे, भिमराव कुवर, देवेंद्र कुवर,आकाश कुवर, विजय कुवर यांसह सिद्धार्थनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी माता रमाईंच्या त्यागाचा वारसा पुढे नेण्याचा आणि समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
माता रमाईंचा त्याग समाजासाठी सदैव प्रेरणादायी; शहाद्यात १२८ वी जयंती उत्साहात साजरी

I have tried many platforms but this one feels the most stable. Everything from login to withdrawal is seamless. Highly recommend 10jilicccasinologin.