(प्रतिनिधी:पंकज गुरव प्रकाशा)
प्रकाशा: नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिणकाशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा येथील वर्षातून एकच दिवस कार्तिकी पौर्णिमेला भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात येणाऱ्या प्रसिद्ध कार्तिक स्वामी मंदिराचा यात्रोत्सव दिनांक 4 नोव्हेंबर मंगळवार रात्री 10:36 वाजता विधीवत पूजनाने मंदिराचे द्वार उघडून यात्रोत्सवाला प्रारंभ झाला तसेच पादुका व मातृका पूजनासह श्री गणेश स्थापना करण्यात आली होम-हवन पूजेचे मानकरी भरत रामदास चौधरी व मनीषाबेन भरत चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक पूजन केले दि.5 नोव्हेंबर रोजी रात्री 12:00 पर्यंत तब्बल 26 तास मंदिराचे द्वार भाविकांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान अध्यक्ष दिलीप ठाकरे(माळीच) तसेच कार्तिक स्वामी मंदिर समितीतर्फे करण्यात आले कार्तिक स्वामी नवसाला पावतात अशी भाविकांची श्रद्धा आहे खडीसाखर शेंगदाण्याच्या नैवेद्य व मोरपीस भाविक मोठ्या भक्तीभावाने चढवितात गावाच्या दक्षिणेला तापी नदी काठावर कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर आहे मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात शिवलिंगासोबत डावीकडे गणपती व उजव्या बाजूला कार्तिक स्वामींचे एकाच पाषाणावर सुंदर अशी मूर्ती आहे दरवर्षी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते यानिमित्त मंदिर परिसरात पूजेचे धार्मिक साहित्य मोरपिसांची दुकाने थाटली असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण दिसून येत आहे एकलव्य नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने भाविकांसाठी भंडारा प्रसाद वाटपाची व्यवस्था केली आहे तसेच समितीकडून मंदिराला रंगरंगोटी विद्युत रोषणाईसह सुशोभीकरण करत भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर सज्ज ठेवण्यात आले आहे येणाऱ्या भाविकांना दर्शनाची व्यवस्था व्हावी म्हणून मंदिराचा गाभाऱ्यासमोर मोठे छेड मंडप उभारण्यात आले असून सुसज्ज व्यवस्था मंदिर समिती भक्तगण व परिसरातील भाविकांमार्फत करण्यात आली..यावेळी स्थानिक प्रशासन तसेच पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
