प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी व केंद्रीय पथकाची भेट

प्रकाशा दि.29- 10- 25 रोजी नाशिक विभागाचे आरोग्य सहाय्यक संचालक डॉ.योगेश चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पथक हे जिल्हा दौऱ्यावर असतांना प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करण्यात आली असता डॉ. चित्ते यांनी केंद्राच्या सर्वांगीण कार्यावर काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या या वेळी प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा सोय सुविधा उपलब्ध नाही असे चौकशी दरम्यान दिसुन आले तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक तसेच खेड्या पाड्यातील दिवसातून असंख्य रुग्ण हे उपचारा साठी येतात पण पुरेसी सोय सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना आरोग्य सेवा मिळत नाही आणि प्रकाशा हे गाव जास्त लोकसंख्येचे त्याच बरोबर येथून तीन राज्यांना जोडणारे महामार्ग देखील आहे म्हणून वेळोवेळी अपघात देखील होत असतात तसेच सध्या कार्यान्वित असलेल्या आरोग्य केंद्रात विविध उपचार केले जातात जसे प्रसुतीसाठी येणाऱ्या महिला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, सर्पदंश, लसीकरण, शवविच्छेदन आदी कामे केली जातात पण पाहिजे त्या सोय सुविधा उपलब्ध नाही म्हणून त्यांना जिल्हा चिकित्सालय व अन्य ठिकाणी रेफर करावा लागतो सध्या प्रकाशा येथील आरोग्य केंद्रात मुबलक जागा ही आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे अशी ही मागणी करण्यात आली होती पण अजून ही प्रतिक्षाच करावी लागत आहे त्यात दोन पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस, आणि इतर कर्मचारी कार्यरत करण्यात यावे जेणे करून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देता येईल तसेच रुग्णवाहिका ही मिळावी अशी ही मागणी करण्यात आली कारण रुग्णांना वेळोवेळी पुरेसी व चांगली आरोग्य सेवा देता येईल… त्यामुळे आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ चित्ते व लोकप्रतिनिधीं यांनी दखल घेऊन ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली….*झुंजार क्रांती न्युज प्रतिनिधी विनोद शिंदे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!