शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख अॅड. राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. ७) शहादा तालुका कार्यालय येथे गरजू पुरुष व महिलांना जेवणाच्या टिफिनचे वाटप करण्यात आले. समाजाभिमुख उपक्रमातून शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जपल्याचे यावेळी दिसून आले.हा उपक्रम शिवसेना तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता. शहादा शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आयोजित टिफिन वाटपाच्या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख यांच्या सह सहशहादा शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे, नंदुरबार जिल्हा युवा सेना उपप्रमुख राजरत्न बिरारे, शिवसेना ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पेंढारकर, जयेश निकम, गोपाल कोळी, लक्ष्मण पवार, कौस्तुभ मोरे, जगदीश ठाकरे, अशोक वसावे, कल्पेश डांगळे, विजय गायकवाड, आप्पा नगराळे, नंदू चव्हाण, यतीश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.या उपक्रमाअंतर्गत पपई, केळी, मिरची तोडणी तसेच इतर मजुरीच्या कामांसाठी दररोज ये-जा करणाऱ्या कामगारांना तीन ताली जेवणाचे टिफिन वाटप करण्यात आले. गरजू मजुरांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला. शिवसेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत असून, सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख अॅड. राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहादा तालुका कार्यालय येथे गरजू पुरुष व महिलांना जेवणाच्या टिफिनचे वाटप करण्यात आले.

What ‘game g88’ offers the best odds and is actually fun to play? Share your winning strategies and favorite games!
Just tried 8qbet and had a blast! The site’s easy to use, and the games are super fun. Definitely worth checking out! Check it out here: 8qbet
8xbetcasino? Yeah, I’ve heard of them and decided to check it out! Cool user experience and a great environment. You should check it out too. Give it a go, mates! Find it here: 8xbetcasino