शहादा तालुका एज्युकेशन सोसायटीतर्फे VTS सराव परीक्षा उत्साहात संपन्न
शहादा : आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी शहादा तालुका एज्युकेशन अँड को-ऑप एज्युकेशन सोसायटी अंतर्गत चालणाऱ्या प्राथमिक विभागाच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांचे मूल्य रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या विकास टॅलेंट सर्च (VTS) परीक्षेची सराव परीक्षा उत्साहात पार पडली.या सराव परीक्षेत एकूण ५९२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध वातावरणात आत्मविश्वासाने परीक्षा दिली.या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी तज्ञ संचालक श्री. एस. पी. पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांचे अनमोल सहकार्य मिळाल्यामुळे परीक्षा सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडली.विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Had a great experience with the daily rewards. It keeps the game exciting even when I am on a losing streak. Love pkluky888
Hiwin777login? The login process was smooth, I’ll give them that! Getting into the site was easy which is always a plus for me before anything, I like that the site is functional. I’d recommend checking out hiwin777login yourself!