दि 22/2/26रोजी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य सेवेसाठीसामाजिक बांधिलकी आणि वैद्यकीयसेवेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्या वैद्यकीय सेवेसाठी महाराष्ट्र शासनातर्फेदिला जाणारावंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न -2024-25राज्यस्तरीय पुरस्कार काल मुंबई येथे मा.आरोग्य मंत्री श्री प्रकाश आबिटकर आणि राज्य आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकरयांच्या हस्ते रुपये 1 लाख आणि सन्मान चिन्ह पुरस्कार डॉ कृष्णा रामचंद्र भावले यांना प्रदान करण्यात आला. व्यसनमुक्ती कार्यासाठी दिला जाणारा हामानाचा सन्मान असून,,22 फेब्रुवारी 2026रोजी, मूंबईतल्या यशवंतराव चव्हाणसभागृहात सकाळी 11वाजता देण्यात आलापुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये वसन्मानचिन्ह आहेडॉ कृष्णा भावले छत्रपती संभाजी नगर चे रहिवासी 2009 पासून गरीब, गरजू, ग्रामीण आणि विशेषत नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील मध्य प्रदेश- महाराष्ट्र सीमावर्ती सातपुडा आदिवासी क्षेत्रात “दारूमुक्त घर -दारूमुक्त गाव अभियान ” मोहीम व्यसनमुक्ती साठी 22 हजार आदिवासी परिवारासाठी व्यसनमुक्ती उपचार, प्रसार-जनजागृती कार्यक्रम आदिवासी गाव आणि पाड्यात आदिवासी परिवारा साठी मोफत उपचार सेवा देत आहेत, आदिवासी युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आदिवासी शाळा मधुन विद्यार्थ्यांना,व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी फिल्म, रॅली,स्पर्धा आदि जनजागृती च कार्य करत आहे. विशेषत या मोहिमेतून 2 हजार पेक्षा जास्त आदिवासी महिलांना व्यसनमुक्ती मार्गावर आणले असून, डॉक्टर भावले छत्रपती संभाजी नगर , येथे ग्रामीण डोंगराळ भाग आणि बंजारा गाव तांडे कन्नड दुर्गमडोंगराळ भाग-गाव या ठिकाणी गरजू परिवाराना व्यसनमुक्ती साठी नाममात्र तर गरीब परिवारा ना मोफत उपचार देतात, शालेय व कॉलेज युवकां साठी व्यसनमुक्ती जनजागृती साठी रॅली, समुपदेशन कार्यक्रम राबवतात.दीड लाख परिवार आज पर्यंत या अभियानाला जोडले गेले असून अनेक परिवार व्यसनमुक्त होऊन नवीन आयुष्य जगत आहे, आदिवासी परिवाराच्या निशुल्क निवासी उपचारासाठी 25 बेडच व्यसनमुक्ती केंद्र सातपुडा आदिवासी क्षेत्रत उभ केल जात आहे . तसेच छत्रपती संभाजी नगर येथे गरजू परिवारा साठी उपचार मोहीम राबविली जात आहे.दीड लाख गरजू परिवारा सोबत व्यसनमुक्ती कार्यासाठी आणि विशेषत 22 हजार आदिवासी परिवारासाठी व्यसनमुक्ती च्या कार्याची सामजिकदखल महाराष्ट्र शासनाने घेऊन आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित केलेहा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून,हजारो व्यसनमुक्त कुटुंबांच्या नवजीवनाचाउत्सव आहे.तसेचसमाजपरिवर्तनाच्याएका प्रेरणादायी चळवळीचाखऱ्या अर्थाने हा सन्मान आहे.डॉ.भावले यांनी राबविलेल्यादारूमुक्त घर – दारूमुक्त गावया अभियानातून अनेक कुटुंबांना आशेचाकिरण मिळाला. व्यसनाच्या अंधारातूनबाहेर पडून स्वाभिमान, आरोग्य आणि आनंदाचामार्ग स्वीकारणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्याआशीर्वादाची पावतीम्हणजे हा पूरस्कार आहे.कुटुंबाची साथ आणि अर्धांगिनीचा ठाम आधार यामुळेचहे कार्य अधिक बळकट करता आले.व्यसनमुक्तीच्या या अभियानासाठीअहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सर्वसाथीदारांना आणि व्यसनमुक्तीच्या वाटेवर नवे जीवनस्वीकारणाऱ्या प्रत्येक परिवाराला हा पुरस्कार समर्पित आहे, असे डॉ.भावले यांनी सांगितले.
राज्य आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकरयांच्या हस्ते रुपये 1 लाख आणि सन्मान चिन्ह पुरस्कार डॉ कृष्णा रामचंद्र भावले यांना प्रदान करण्यात आला
