राष्ट्रीय शालेय फेंसिंग स्पर्धेसाठी खलीक शेख यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड
शहादा, जि. नंदुरबार |भारत सरकारच्या क्रीडा व युवक सेवा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) यांच्या मान्यतेने आयोजित 69व्या राष्ट्रीय शालेय फेंसिंग स्पर्धा 2025–26 साठी शहादा (जि. नंदुरबार) येथील खलीक जसीम शेख यांची तांत्रिक अधिकारी (Technical Official) म्हणून अधिकृत निवड करण्यात आली आहे. ही निवड नंदुरबार जिल्ह्यासाठी गौरवास्पद मानली जात आहे.ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील डिव्हिजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडणार असून, अंडर–14 गटासाठी 21 ते 25 डिसेंबर 2025 आणि अंडर–17 गटासाठी 27 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील शेकडो खेळाडू सहभागी होणार आहेत.SGFI अंतर्गत होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा या Government-Recognised Sports Event असून, तांत्रिक अधिकारी म्हणून निवड होणे म्हणजे खेळातील नियमांची सखोल माहिती, पंचगिरीतील कौशल्य आणि विश्वासार्हतेची अधिकृत मान्यता समजली जाते. राष्ट्रीय स्पर्धेत सामन्यांचे नियमांनुसार संचालन, पंचव्यवस्था, स्कोअरिंग आणि पारदर्शकता राखण्याची महत्त्वाची जबाबदारी तांत्रिक अधिकाऱ्यांवर असते.या निवडीबद्दल टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक मा. अशोक दुधारे सर, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सहसचिव डॉ. उदय डोंगरे सर, नंदुरबार जिल्हा तलवारबाजी सचिव मा. भागुराव जाधव सर तसेच PSGVP महाविद्यालयाचे क्रीडा संचालक मा. अरविंद कांबळे सर यांच्या मार्गदर्शन व पाठिंब्याबद्दल खलीक शेख यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडा प्रतिनिधी राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याने ही निवड जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशी भावना क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.
