शहाद्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा जल्लोष; राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवरायांना अभिवादन.शहादा,दि.१९ (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. शहादा शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. महाराजांच्या अचाट पराक्रमाची आणि स्वराज्य स्थापनेच्या गौरवशाली इतिहासाची यावेळी उजळणी करण्यात आली. “महाराजांचे विचार केवळ भाषणात न ठेवता ते प्रत्यक्ष आचरणात आणू,” असा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नेते प्रमोद अमृतकर, आप्पा जयसिंग पावरा,शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, तालुकाध्यक्ष संतोष पराडके, कार्यकर्ते राजू वाघ, अक्षय अमृतकर, डॉ. जितेंद्र भंडारी, प्रकाश पवार, राजू सोनवणे, संजय खंदारे, हिरालाल जगदेव, छोटू कुवर, जितेंद्र शिकलीकर, प्रभू नाईक, अजिंक्य जवेरी, महेंद्र कुवर, विष्णू भगरे ,जगदीश माळी, मनोहर मराठे, दीपक बेडसे, शुभम कुवर, विकास कुवर, विपुल रोकडे यांसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.उत्साही वातावरणसंपूर्ण शहादा परिसरात शिवजयंतीनिमित्त भगवेमय आणि देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ठिकठिकाणी होणाऱ्या या उपक्रमांमुळे जनसामान्यांमध्येही मोठा उत्साह दिसून आला.
शहाद्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा जल्लोष; राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवरायांना अभिवादन
