शहादा तालुक्यातील होळगुजरी गाव शिवारातील शेतात एक मोठे पक्षी रोहित महाले, नवनाथ महाले व त्यांच्या काही मित्रांना दिसुन आले सदर पक्षास उडता येत नसल्या कारनाने त्यांनी तेथे जाऊन पक्षाचे फोटो काढून नंदुरबार येथील वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबार चे अध्यक्ष संजय वानखेडे यांच्याशी संपर्क केला त्यांनी तो फोटो गिधाडाचा असल्याचे समजले व लगेच शहादा वनविभाग यांच्याशी संपर्क करुन गिधाडाची माहिती दिली वनविभाग कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षित रेस्क्यू करुन वनविभाग शहादा येथे आणण्यात आले. गिधाडाच्या मानेवर जिओ टॅग व पायांमध्ये विशिष्ट प्रजारचे पट्टी लावलेली असल्यामुळे पुढील तपास वनविभाग शहादा चे अधिकारी करीत आहेत. या बद्दल अधिक माहिती देतात वानखडे यांनी सांगितलं की हा *हिमालयीन ग्रिफॉन गिधाड* हे भूमध्यसागरीय, आफ्रिका आणि आशियातील पर्वतीय प्रदेशात राहणारे मोठे जुन्या जगातील गिधाडे आहेत. ही प्रजाती मेंढपाळ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते, प्रामुख्याने गुरेढोरे, हरीण आणि मेंढ्या यांसारख्या मोठ्या सस्तन प्राण्यांच्या मृतदेहांवर आहार घेते. आययूसीएनच्या यादीनुसार गिधाडे अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती आहेत. पक्ष्याच्या पायावर एक टॅग आहे, जो सूचित करतो की तो एखाद्या संशोधन किंवा संवर्धन कार्यक्रमाचा भाग असू शकतो. *संजय वानखेडे* *संस्थापक अध्यक्ष* *वण्यप्रानी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबार*
होळगुजरी शिवारात दुर्मिळ हिमालयीन ग्रिफोन गिधाड आढळला
