शहादा येथील पोलीस स्टेशन विभाजित करण्यासह पुरेसा अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी गृहराज्यमंत्री यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाची मागणी
.शहादा जि.नंदुरबार शहरातील पोलीस स्टेशनला लोकसंख्ये नुसार तात्काळ पुरेसा कर्मचारी व अधिकारी वर्गउपलब्ध करुन देणे सह शहादा पोलीस स्टेशन विभाजित करुन शहादा शहर व शहादा ग्रामीण भागाकरिता स्वतंत्र वेगळे-वेगळे पोलिस ठाणे निर्मिती करण्याकरिता राज्याचे गृहराज्यमंत्री म.ना.योगेश कदम यांना शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले असता ना.योगेश कदम यांनी शहादा पोलीस स्टेशन विभाजित करण्याबाबत अहवाल मिळाल्यावर तात्काळ कार्यवाही करुन शहादा पोलीस स्टेशन विभाजित करण्यास मान्यता देण्यात येईल असे आश्वासित केले. यावेळी आमदार कार्यालयात आ.चंद्रकांत रघुवंशी,आ.आमश्यादादा पाडवी,शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.रामभैय्या रघुवंशी,जिल्हा प्रमुख गणेशदादा पराडके आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.योगेश कदम नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असतांना नंदुरबार येथील आमदार कार्यालायत शिवेसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन देत मागणी केली की,राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पोलीस विभागाची आहे.राज्यातील आदिवासी बहुल म्हणुन ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा हा तालुका सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसला आहे.शहाद्यापासून सुमारे १५ ते २० की.मी.अंतरावर मध्यप्रदेश व गुजरात राज्याचा सीमावर्ती भाग आहे.या भागातून आंतरराज्य गुन्हेगार अवैधरीत्या दारूची तस्करी,शास्त्रास्त्रे,रेशनचे धान्य,वाळू-गौण खनिज,वन संपत्तींची तस्करी करीत असतात.तसेच घरफोडी,चारचाकी-दुचाकी वाहन चोरी बाबतही संबधित पोलीस ठाण्यात वेळोवेळी मोठ्याप्रमाणात गुन्ह्यांची नोंदही केली जाते मात्र,कमी पोलीस कर्मचारी संख्येमुळे तपास कार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे स्पष्टपणे दिसुन येत आहे. सन १९९८ ला नंदुरबार स्वतंत्र जिल्हा म्हणुन निर्मिती करण्यात आली.मात्र जिल्हानिर्मिती पुर्वी असलेली कर्मचारी संख्याच आजही दुर्दैवाने कायम आहे.नंदुरबार जिल्हयातील शहादा हे औद्योगिक,शैक्षणिक ,व्यावसायिक,राजकीय,धार्मिक,सामाजिक दुष्टया अग्रेसर तालुक्याचे ठिकाण आहे.शहादा शहरासह ग्रामीण भागातील ९६ गावांचा समावेश शहादा पोलिस स्टेशनला करण्यात आला असुन प्रकाशा व असलोद येथे पोलिस दुरक्षेत्र आहेत.शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे शेवटच्या अनेक गावाचे अंतर सुमारे ३५ किलोमीटरवर आहे.शहादा पोलीस स्टेशनला सद्यस्थितीत १ पोलीस निरीक्षक,५ सहा. पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक व ८१ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.त्यात शहादा पोलीस स्टेशनच्या सध्या नियुक्त कर्मचारी संख्येतून असलोद व प्रकाशा दुरक्षेत्रसाठी २ अधिकारीसह १२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.वाहतुक नियंत्रणासाठी दररोज सुमारे८ कर्मचाऱ्यांचा डयुटी लावण्यात येते.गार्डडयुटीसाठी १ अंमलदार व ३ कर्मचारी (शास्त्रागार,ट्रेझरी,तुरुंग) नियुक्त केले आहेत.गुन्हे शोध पथक (डीबी)साठी १२ कर्मचारी असतात.१२/१५ कर्मचारी साप्ताहिक सुटी,रजा,गैरहजर असतात.शहादा शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षाही अधिक झाली असुन शहादा शहर हे झपाट्याने विस्तारित होत आहे.तसेच शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील गावांचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढत असुन याबाबत विचार करता शहादा पोलीस स्टेशनला नियुक्त पोलीस कर्मचारी बळ अपुरे ठरणारे आहेत.तसेच सण-उत्सव,सभा,संमेलन,निवडणुका आदीच्या वेळेस अतिरिक्त पोलीस बळ मागविणे आवश्यक ठरत असते. धार्मिक व सामाजिक दुष्टया अनेकदा संवेदनशीलबाबी घडत असतात.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रणासाठी पुरेसा पोलीस बळ असणे आवश्यक असते.मात्र हजर ४०ते ५० पोलीस कर्मचाऱ्यांवर परिस्थिती हाताळतांना संबंधितांची मोठी कसरत होत असल्याने अनेकदा चित्र स्पष्ट होत असते. तरी शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील नोंद होणाऱ्या घटना,गुन्ह्यांचा तपास जलदगतीने व्हावा,सर्व सामान्य जनतेस भयमुक्त जीवन जगता यावे यासाठी तात्काळ पोलीस व अधिकाऱ्यांच्या अधिक पदांना मंजुरी सह पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात यावे व शहादा शहर व ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात झपाट्याने विस्तारासह वाढती लोक संख्येचा विचार करीत लवकरात-लवकर शहादा पोलीस स्टेशन विभाजित करुन शहादा शहर व शहादा ग्रामीण भागाकरिता स्वतंत्र वेगळे-वेगळे पोलिस ठाणे निर्मिती करण्यात यावी ही मागणी केली असता गृहराज्यमंत्री ना.योगेश कदम यांनी शहादा पोलीस स्टेशन विभाजित करण्याबाबत अहवाल मिळाल्यावर तात्काळ कार्यवाही करुन शहादा पोलीस स्टेशन विभाजित करण्यास मान्यता देण्यात येईल असे आश्वासित केले.निवेदनावर शहादा शिवसेना तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या सह शिवसेना शहादा शहर व नगरसेवक जितेंद्र जमदाडे,युवासेना जिल्हा उपप्रमुख राजरत्न बिरारे,जयसिंग ठाकरे,लक्ष्मण पवार,एकनाथ ठाकरे,अशोक वसावे प्रा.विजय गायकवाड,गोप[गोपाल कोळी,अंकुश लोहार,कौस्तुभ मोरे,विजय महाले सह्या असुन यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. मनलेश ए. जायसवालतालुका प्रमुख,शिवसेनाशहादा तालुका.

Downloaded the 661betapp. Haven’t used it much yet, but it seems really well-made. Good graphics and simple controls. Will check how it does overall at 661betapp.
68wim seems like a fun place to hang out and play. The community aspect seems big, which is cool. Give it a look for some new friends and games! Check the site 68wim.
Just checked out 76n. Looks pretty slick Gotta say, I’m intrigued. Worth a look if you’re after something new. Find it here: 76n