मानव विकास पत्रकार संघ नंदुरबार जिल्हाच्या वतीने 28 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस उत्साहात साजरा

शहादा : मानव विकास पत्रकार संघ नंदुरबार जिल्हाच्या वतीने 28 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस उत्साहात साजरा

.प्रतिनिधी = नरेश शिंदे

माहिती अधिकार कायदा 2005 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नवबौध्द विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ. माधुरी बोरसे मॅडम यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून झुंजार क्रांती वृत्तपत्राचे संपादक कृष्णा कोळी, ए. टी. नेरपगार, मानव विकास पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष नरेश शिंदे,अनिता अशोक पाटील, तेजराज निकुंभे, संजय कोळी, चव्हाण सर उपस्थित होते माहिती अधिकार बद्दल कृष्णा कोळी यांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायदा 2005, त्यातील तरतुदी तसेच पारदर्शक शासनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा, यामध्ये सहभाग घेतला. तसेच गुणवत्ता धारक विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आल्या “माहिती हाच माझा हक्क” या घोषवाक्याने कार्यक्रमाला वेगळेच उर्जित वातावरण मिळाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनीने केले. उपस्थित शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांनी माहिती अधिकार दिन साजरा करून समाजात पारदर्शकतेचा संदेश दिला. यावेळी घनश्याम सोनवणे माहिती अधिकार महासंघ यांचे विशेष योगदान लाभले. अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!