भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) शहादा वमहाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ( लालबावटा )शहादा तालुका कमिटी मार्फततहसील कार्यालयावर धडक मोर्चा

भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) शहादा वमहाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ( लालबावटा )शहादा तालुका कमिटी मार्फततहसील कार्यालयावर धडक मोर्चा

आज दिनांक 09/09/2025 वार मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा तालुका कमिटी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांचा वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आयोजित केला आहे. सदर मोर्चात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आलेल्या आहेत.सदर मागण्या शासन स्तरावरून त्वरित मंजूर करण्यात याव्यात.1) जन सुरक्षा विधेयक ( कायदा) त्वरित रद्द करण्यात यावा.2) संजय गांधी, श्रावण बाळ, भूमिहीन शेतमजूर, दिव्यांग तसेच राष्ट्रीय अर्थ सहाय्याची रक्कम त्वरित अदा करावी.3) गायरान व वन जमीन कसणाऱ्यांचा नावे त्वरित 7/12 द्यावा.4) रो. ह. यो. अंतर्गत मजुरांना 700/- रुपये मजुरी अदा करावी.5) वृद्धाना पेंशन योजना त्वरित लागू करावी.6) शबरी आवास, रमाई आवास योजनेतर्गत घरकुलाचा लाभ त्वरित देण्यात यावा.7) दरा, चिंचोरा, विरपूर या ग्रामपंचायतचे त्वरित विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा द्यावा.8) पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार बंद करून पूर्वीप्रमाणे नावे कमी करणे, नावे वाढविणे व हमीपत्र त्वरित स्वीकारावे.9) शेतकरी कर्जमाफी त्वरित झाली पाहिजे.10) शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा.11) ऊसतोड कामगार, बांधकाम कामगार, विटभट्टी कामगारांचे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नोंदी घेण्यात याव्या.12) कामगार कल्याण विभागामार्फत भांडे संच वाटपात संबधित एजन्सी लाभार्त्यांची सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी संबंधित एजन्सी ची असून सुविधा न दिल्यास एजन्सी त्वरित रद्द करावी.13) दरा धरण बुडीत क्षेत्रातील जमिनी त्वरित संबंधिताना मिळाल्या पाहिजे.14) गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी.15) जन्म/ मृत्यू दाखल्याचे ( आदेशाचे) थांबवलेले काम त्वरित सुरु करावे. तहसीलदार श्री. दिपकजी गिरासे साहेबांना एक तास घेराव घालून मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.शिष्टमंडळ पुढीलप्रमाणे होते.1) कॉ.सुनिलभाऊ गायकवाड 2) कॉ.खंडूभाऊ सामुद्रे 3) डॉ.सुरेशदादा नाईक 4)किरण मोरे 5) कॉ.देवानंद चव्हाण 6) कॉ. संतोष गायकवाड 7) कॉ. राजाराम ठाकरे 8) कॉ. कैलास चव्हाण 9) वेडूदादा पाटिल 10) रमण पेंटर 11) कॉ. बनूभाऊ ठाकरे 12) कॉ. लखा दादा13) कॉ. मेहरबान दादा 14) कॉ. भिका ब्राह्मणे 15) कॉ. दिनेश गुलाले 16) कॉ दिनेश पाटील 17) कॉ. मासूम मन्यार 18) कॉ. हारूभाऊ सोनवणे 19) कॉ. अनिल ठाकरे 20) कॉ. जिराबाई ठाकरे 21) कॉ. सतिलाल महिरे 22) कॉ. संजय बागले 23) कॉ. रफिक शेख 24) कॉ. छायाबाई पानपाटील 25) कॉ. रतन पटले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!