शहाद्यात शिवसेना जनसंपर्क कार्यालयात बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी.

शहाद्यात शिवसेना जनसंपर्क कार्यालयात बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी.शहादा,दि.२३ (प्रतिनिधी)शहादा तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहादा येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल आणि युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख राजरत्न बिरारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत विचारांचे आणि नेताजींच्या अतुलनीय देशप्रेमाचे स्मरण करण्यात आले.याप्रसंगी शहादा तालुका व शहर शिवसेनेचे पदाधिकारी मंदाताई सोनवणे, दिलीप पवार, लक्ष्मण पवार, गणेश माळी, एकनाथ ठाकरे, गोपाल कोळी, किरण बोरसे, जयेश निकम, कौस्तुभ मोरे, गुलाब सुतार, मनोज सोनवणे, रोशन कोळी, मधुकर सोनवणे, प्रवीण सैदाने, विक्की पवार, अभय जैन, संदीप ठाकरे, तेजस निकुंभे, मोहन माळी, कल्पेश डांगळे यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!