प्रजासत्ताक दिनानिमित्त महापुरुषांच्या स्मारकांवर रोषणाई करा; राष्ट्रवादी काँग्रेसची शहादा पालिकेकडे मागणी.शहादा,दि.२३ (प्रतिनिधी)येत्या २६ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहादा शहरातील विविध महापुरुषांच्या स्मारकांचे सुशोभीकरण करावे व त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असल्याने शहरात एक चैतन्यमय वातावरण असावे आणि महापुरुषांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी स्मारकांची स्वच्छता करून तिथे दिव्यांची रोषणाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.याप्रसंगी वाजिद सय्यद, विपुल रोकडे, जितेंद्र सिकलीकर, कृष्णा सोनवणे, वसीम मेवाती, अल्ताफ पिंजारी, मुज्जू सय्यद, दीपक आगळे, वसीम खान, विकास कुवर, आकाश कुवर, चंदू कुवर, शुभम कुवर, अलमास बेलदार, अजिंक्य जवेरी गुड्डू सय्यद यांसह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
