हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर कोट्यवधींचा महसूल घोटाळा?मुख्यमंत्री सचिवालयाच्या पत्रांनाही केराची टोपली? परिवहन विभागाच्या मौनामुळे संशय अधिक गडद; जनआंदोलनाचा इशारा

हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर कोट्यवधींचा महसूल घोटाळा?मुख्यमंत्री सचिवालयाच्या पत्रांनाही केराची टोपली? परिवहन विभागाच्या मौनामुळे संशय अधिक गडद; जनआंदोलनाचा इशारा!धुळे / शिरपूर | प्रतिनिधीधुळे जिल्ह्यातील हाडाखेड सीमा तपासणी नाका (ता. शिरपूर) येथे सुरू असलेल्या कथित अनियमितता, वाहनचालकांची आर्थिक लूट, शासन महसुलातील संभाव्य तफावत आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत वारंवार लेखी तक्रारी करूनही राज्य शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.तक्रारदाराने मुख्यमंत्री सचिवालय, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन), परिवहन आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी आदींकडे अनेक वेळा पुराव्यासह तक्रारी व स्मरणपत्रे सादर केली. मात्र अद्याप कोणतीही निष्पक्ष चौकशी, लेखी खुलासा किंवा दोषींवर कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.मुख्य आरोप कोणते?सीमा तपासणी नाक्यावर खासगी एजन्सी कार्यरत असताना आरटीओ अधिकारी वाहनांचे मोजमाप, वजन तपासणी व इतर कामे कोणत्या कायदेशीर अधिकाराने करतात?ऑनलाइन सुविधा उपलब्ध असतानाही वाहनचालकांना १० ते १५ मिनिटे थांबवून ३ किलोमीटरपर्यंत रांगा का लावल्या जातात?हाडाखेड सीमा तपासणी नाका व शिरपूर–पळासनेर टोल प्लाझा येथे जवळपास समान वाहनवाहतूक असूनही शासन महसुलात कोट्यवधी रुपयांची तफावत का?संबंधित दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज आजपर्यंत का उपलब्ध करून दिले गेले नाही?संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी का टाळली जात आहे?महसूलातील तफावत म्हणजे मोठ्या घोटाळ्याचे संकेत?तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सीमा तपासणी नाका आणि शिरपूर–पळासनेर टोल प्लाझा येथील वाहनसंख्या व महसुलाची तुलनात्मक चौकशी केल्यास शासनाच्या महसुलातील मोठी तफावत समोर येऊ शकते. या प्रकरणात उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी झाल्यास कोट्यवधी रुपयांचा कथित भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे.मुख्यमंत्री सचिवालयाच्या पत्रांचे पुढे काय झाले?दि. ११ जून २०२६ व १८ जून २०२६ रोजी मुख्यमंत्री सचिवालयातून परिवहन विभागाकडे योग्य त्या चौकशीसाठी पत्रे पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र त्या पत्रांवर आजपर्यंत कोणती कार्यवाही झाली, याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जनआंदोलनाचा इशारातक्रारीवर तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास व्यापक जनआंदोलन, उपोषण, पत्रकार परिषद तसेच न्यायालयीन लढा उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.आता जनतेचा एकच सवाल…हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर येणार का? की शासनाच्या मौनामुळे संशय आणखी गडद होणार?