विनापरवाना पाणीपुरी कारखान्यावर धाडभेसळुयुक्त 77 हजारांचा मुद्देमाल जप्त ; अन्न प्रशासनाची कारवाई
नंदुरबार :-नंदुरबार शहरातील बसस्थानक परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या एका पाणीपुरी निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने ( अन्न सुरक्षा विभाग ) धडक कारवाई करत कारखाना सील केला. तपासणी दरम्यान उत्पादनस्थळी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, भेसळयुक्त खाद्यपदार्थ तसेच अन्नसुरक्षा नियमाचे उल्लंघन आढळून आल्याने सुमारे 77 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील खाद्यपदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.राज्यात नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अन्न सुरक्षा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई सुरू असून नंदुरबार जिल्ह्यातही तपासणी मोहिमेला वेग आला आहे. याच मोहिमेअंतर्गत मंगळवारी सायंकाळी सहाय्यक आयुक्त सपना गोडसे-पाटील तसेच अन्नसुरक्षा अधिकारी तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नंदुरबार बसस्थानक परिसरातील एका पानपुरी निर्मिती कारखान्यावर अचानक छापा टाकला. तपासणी दरम्यान कारखान्यात अत्यंत अस्वच्छ वातावरणात पाणीपुरी तयार केली जात असल्याचे निर्दशनास आले. उत्पादन प्रक्रियेत आवश्यक स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याचे दिसून आले. तसेच पामतेल सुजी आणि तयार पाणीपुरीच्या दर्जाही निष्कृष्ट असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या पदार्थाच्या वापर ग्राहकांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकतो, अशा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर संबंधित कारखाना तातडीने सील करण्यात आला. तसेच येथील सुमारे 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित प्रकरणात अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया केली आहे. या कारवाईनंतर शहरातील पाणीपुरी, फास्टफूड तसेच इतर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून अन्न प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या इशारा दिला आहे. उत्पादन स्टडी स्वच्छता दर्जेदार कच्च्या मालाचा वापर, वैध परवाना आणि अन्नसुरक्षा नियमाचे पालन अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अन्न प्रशासनाने नागरिकांनाही आव्हान केले असून, अस्वच्छ ठिकाणी तयार होणारे अथवा संशयास्पद दर्जाचे खाद्यपदार्थ आढळल्यास त्वरित तक्रार करावी, असे सांगितले आहे नागरिकांच्या आरोग्याची तडजोड करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही आणि अशा व्यवसायिकांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे इशारा प्रशासनाने दिला आहे.सविस्तर बातमी तयार करून द्या
