शहादा, लोणखेडा व म्हसावद मंडलातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात संपन्नशक्तीकेंद्र प्रमुख व BLA-1 यांच्या माध्यमातून संघटन बळकटीवर भर
शहादा | प्रतिनिधीदि. ३ जुलै २०२६ रोजी भारतीय जनता पक्षाच्या शहादा शहर, लोणखेडा व म्हसावद मंडलातील सर्व शक्तीकेंद्र प्रमुख, BLA-1 तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक लोणखेडा महाविद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.बैठकीस भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक मा. विजयभाऊ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष मा. निलेशभाऊ माळी होते.यावेळी संघटन अधिक सक्षम करण्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाची रचना मजबूत करणे, BLA-1 यांची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे, बूथ स्तरावरील नियोजन, मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.बैठकीत विधानसभा SIR प्रमुख श्री नारायण ठाकरे, राज्य परिषद सदस्य श्री विनोद जैन, शहादा शहर मंडल अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चौधरी, लोणखेडा मंडल अध्यक्ष श्री नितीन पाटील तसेच म्हसावद मंडल अध्यक्ष श्री विश्वास ठाकरे यांनीही उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.या बैठकीला शहादा शहर, लोणखेडा आणि म्हसावद मंडलातील शक्तीकेंद्र प्रमुख, BLA-1, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आगामी संघटनात्मक कार्यक्रमांचे नियोजन, बूथ सक्षमीकरण आणि पक्ष विस्तारासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात .
