चिमठाणे प्रतिनिधी- प्रविण भोई
.चिमठाणे गाव शिवारात दराणे फाटयाजवळ पेट्रोलपंप शेजारी धुळे -नंदुरबार ट्रेलर ट्रक यांच्यात सकाळी आठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. त्यात 25 ते 30 प्रवाशी असल्याची माहिती बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी दिली. अपघात ग्रस्त बस एम. एच 20 बी.एल २६०० ही धुळ्याकडून नंदुरबार कडे जात होती. एम.एच २१ बी. एच ८९७९ हा ट्रक दोंडाइचा कडून सोनगीर कडे जात होता…यां दोघी वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली… त्याच्यात बस चालक अनिल देवरे यांचे दोघी पाय दाबले गेल्याने गंभीर दुखापत झाली आहे . दोघी वाहनांचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. रस्त्याचे काम चालू असल्याने वाहने पास होतांना एका बाजूला खोल भाग व दुसऱ्या बाजूला काँक्रेट रस्ता व रत्यालगत मातीचा भर असल्याने वाहने पास होतं नाहीत. त्या कारणाने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.तर अपघात होताच घटनास्थळावरून ट्रक ड्रायव्हर पसार झाला . व इतर ७ ते ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत…त्यांना प्राथमिक उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.. पोलिसांचा आघाताच्या घटनास्थळी पंचनामा….
