शिंदखेडा आगार वाहणांकडे लक्ष द्या एसटीच्या तुटलेल्या पत्र्यांमुळे अपघाताला आमंत्रण …… एस टी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे.मात्र एस टीच्या पत्र्याने वाहनाचा अपघात झाल्याचे आपण बघितले असेल तर ते कशामुळे होतात तर एखादी एस टीचा पत्रा बाहेर निघाला असेल किंवा कापला गेला असेल..अशीच पत्रा निघालेली एस टी बस चिमठाने बसस्थानकात दिसली ती बस शिंदखेडा आगाराची होती.शिंदखेडा तालुक्यातून आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात खेडो पाडी गावांमध्ये एसटी बसेस जात असतात .बस आगारतून निघतांना वाहनाची तपासणी करणे बंधनकारक आहे मग आगारातून निघतांना अशा बसेस ची तपासणी होते की नाही? कारण एस टीचा बाहेर निघालेला पत्रा हा अपघाताला आमंत्रण देणे होऊ शकते कारण खेडे पाड्यांचा रस्ता हा रुंद असतो आणि काटे कुट्यांचा झुडपे असतात.आणि अशातच ओहरटेक करतांना किंवा समोरच्या वाहनांना साईड देताना जर वाहनाचा पत्रा बाहेर निघाला असेल तर.अपघात होण्याची शक्यता अधिक बळकावते म्हणून आगारातून एस टी निघतांना रोज आगार प्रमुखांनी वाहनांची तपासणी करणे महत्वाचे आहे जेणेकरून काही अनुचित घटना घटू नये .
शिंदखेडा आगार वाहणांकडे लक्ष द्या एसटीच्या तुटलेल्या पत्र्यांमुळे अपघाताला आमंत्रण .
