विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल कोल्हापूर येथे सर्पजनजागृती कार्यशाळेचे यशस्वीपणे आयोजन

विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल कोल्हापूर येथे सर्पजनजागृती कार्यशाळेचे यशस्वीपणे आयोजन

       वर्ल्ड फॉर नेचर संस्थेने कोल्हापूर तसेच आसपासच्या इतर  जिल्ह्यातील ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यांच्यावर सर्प जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत आज वर्ल्ड फॉर नेचरने विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल कोल्हापूर या शाळेत ५०० विद्यार्थ्यांसाठी सर्प जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.

         वन्यजीव व सापांच्याबद्दल असणारे गैरसमज व अंधश्रद्धा या दूर होण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सर्प व इतर वन्यजीव दिसल्यावर नक्की काय करावे व काय करू नये याची सहज सोप्या भाषेत अगदी पाचवीपासून ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत माहिती देण्यात आली. पावसाळ्यात पुराच्या पाण्यासोबत वाहून येणाऱ्या सापांबद्दल काय काळजी घेतली पाहिजे याची देखील माहिती देण्यात आली.

        विद्यार्थ्यांच्या शंका, प्रश्न यांना उत्तरे देत त्यांच्या मनातले सर्व गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्यात आल्या. मोठ्या उत्साहात संवाद साधत ही कार्यशाळा पार पडली.

        हि कार्यशाळा आयोजित करण्यासाठी विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता देशपांडे मॅडम व सर्व शिक्षक वर्ग यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेसाठी वर्ल्ड फॉर नेचर टिमचे अमर गावडे, प्रसन्न वरखेडकर, विनोद पवार व अभिजीत वाघमोडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!