*दुःखद निधन*नंदुरबार: धावडे, ता.शिंदखेडा येथील मूळ रहिवासी आयुष्यमती द्वारकाबाई प्रल्हाद रामराजे (85) यांचे वृद्धापकाळाने 7 सप्टेंबर रोजी पहाटे 6 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी चार वाजता 92,राजगृह, कल्याणी रेसिडेंन्शियल, राकसवाडे शिवार, ता. नंदुरबार, तळोदा रोड, चावरा इंग्लिश स्कुल समोर येथुन निघणार आहे. त्या सिद्धार्थ प्रल्हाद रामराजे, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण प्रल्हाद रामराजे, सामाजिक कार्यकर्ते राजेश प्रल्हाद रामराजे यांच्या आई तर बँक ऑफ बडोदा बारडोल शाखेचे मुख्य व्यवस्थापक संघदीप विजय रामराजे, सामाजिक कार्यकर्ते राहुल सिद्धार्थ रामराजे, ‘लोकमत’ नंदुरबार कार्यालयाचे वरिष्ठ उपसंपादक भूषण विजय रामराजे यांच्या आजी होत.
वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण रामराजे यांना मातृशोक
