प्रकाशा येथील कार्तिक स्वामींच्या दर्शना साठी भाविकांची अलोट गर्दी

शहादा= शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील कार्तिक स्वामींच्या मंदिरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त बुधवारी उत्सव साजरा झाला. कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची मंगळवारी रात्रीपासून गर्दी केली होती. हे मंदिर वर्षातून एकाच दिवशी अर्थात कार्तिक पौर्णिमेला उघडण्यात येते. मंगळवारी रात्री १० वाजून ३६ मिनिटांनी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. गणपती पूजन करून मंदिर भरत रामदास चौधरी व मनीषाबेन भरत चौधरी यांच्या हस्ते सपत्नीक होमहवन केले. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाविकांनी मोरपीस खरेदी करून मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्यातील गणपती, कार्तिक स्वामी यांचे दर्शन घेऊन पूजा केली. कार्तिक स्वामींच्या चरणी दहा, वीस, पन्नास रुपयांची नोटांवर स्वास्तिक चे चिन्ह तयार करून कार्तिक स्वामींचा मंत्र बोलून चरणस्पर्श केल्यानंतर भाविक खिशात ठेवताना दिसून आले. गावाच्या दक्षिणेला तापी नदीकाठावर कार्तिक स्वामींचे पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगासोबतच डावीकडे गणपती, तर उजव्या बाजूला कार्तिक स्वामी एकाच मूर्तीत दोन्ही आकर्षक छबी आहेत.कार्तिक स्वामी मंदिर परिसरात मनीषापुरी माता, खंडेराव महाराज, दक्षिणमुखी मारुती, सिद्धिविनायक, शनिदेव, ऋणमुक्तेश्वर, ध्रुतपापेश्वर, चिंतामणी महादेव ही मंदिरे आहेत. कार्तिकी पौर्णिमेस येथील कार्तिक स्वामी मंदिरावर यात्रा भरते. कार्तिक स्वामी नवसाला पावतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. कार्तिक स्वामींना खडीसाखर, शेंगदाण्याचे नैवेद्य व मोरपीस भाविक मोठ्या भक्तिभावात चढवितात. त्यामुळे दर वर्षी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी होते.एक मोरपीस कार्तिकस्वामींच्या चरणी ठेवले, तर दुसरे घरी नेण्यात आले.या मंदिर परिसरात फुले, मोरपीस, पूजेचे साहित्य व इतर दुकानेकन थाटल्याने यात्रेचे स्वरूप आले होतेमंदिरासमोर बॅरिकेड्स लावल्यामुळे आलेल्या भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले. मंदिर गाभाऱ्यात गर्दी होऊ नये म्हणून मंदिर समितीचे सदस्य व स्वयंसेवकांनी सहकार्य केले. भाविकांची दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती. वर्षातून एकदा मंदिर उघडते म्हणून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणावर प्रकाशा कार्तिक स्वामी मंदिरावर येतात म्हणून प्रकाशा येथील सप्तशृंगी माता पदयात्राभवानी हाटी, एकलव्य गणेश मंडळ, यांनी मंदिर परिसरात मंडप लावून आलेल्या भाविकांना दिवसभर महाप्रसादाचे वाटप करून सेवा दिली.कार्तिक स्वामी मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष दिलीप भील, उपाध्यक्ष राजेंद्रमिस्त्री, सचिव रमेश माळी, सदस्य कैलास माळी, अरुण भील, पुण्या भील, पिंट्या भील, अंबालाल भील, , विनोद ढाकणे आदींनी सहकार्य केले. कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी रात्री माजी मंत्री आमदार विजयकुमार गावित जिल्हा परिषद माजी सभापती हेमलता शितोळे रामचंद्र पाटील पवन चौधरी विविध का.सो चेअरमन दिलीप पाटील आधी मान्यवरांनी दर्शन घेतले , शहादा येथील पोलिस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता…*झुंजार क्रांती न्युज प्रतिनिधी विजय परदेशी*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!