*मांगल्यम इंटरनॅशनल स्कूल प्रकाशा येथे गीता जयंती उत्सहात साजरी* (प्रतिनिधी पंकज गुरव प्रकाशा)प्रकाशा: येथील मांगल्यम इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने 1डिसेंबर गीता जयंती निमित्त पवित्र गीता ग्रंथाचे पूजन करून गीता जयंती साजरी करण्यात आली हा पवित्र दिवस श्रीमद्भगवद्गीतेच्या महान उपदेशांना समर्पित आहे भगवद्गीता हा जीवनाचं सार सांगणारा पवित्र ग्रंथ आहे गीतेतील श्लोकाचे चिंतन करणे आणि त्यांच्या आपल्या जीवनात अमल करणे महत्वाचे आहे शाळेत दर आठवड्याला विद्यार्थ्यांकडून एक गीतेच्या श्लोक पाठ करून घेतला जातो आज शाळेतील विधार्थ्यानी गीतेचा 1ला अध्याय आणि 12वा अध्याय तोंड पाठ पठण करून वातावरण मंत्रमुग्ध केले तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि अर्जुनाची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात Nr. Kg. नर्सरी ते चौथी 4th पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते या वेळी श्री प्रशांत उपासनी यांनी प्रास्ताविक केले त्यात विद्यार्थ्यांना शिक्षण तर आवश्यक आहेच परंतु शिक्षणासोबतच संस्कार हि किती महत्वाचे ते समजावून सांगितले. तसेच यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ जयश्रीताई अहिरे श्री किशोरभाई चौधरी, आणि श्री अमोल पाठक उपस्थित होते त्यांनी हि विधार्थ्याना मार्गदर्शन केले त्यात भारताकडे जग विश्वगुरु म्हणून बघते याचे कारण समस्त मानवाला सुखाने जगण्याची हमी शिक्षण देणारा संस्कारी असा भगवत गीता हा जगमान्य पवित्र ग्रंथ आमच्याकडे आहे. गीतेला ना धर्मबंधन ना सीमांचे बंधन याचे महत्व एवढे की न्यायालयात पण यावर हात ठेवून शपथ घेतली जाते.आज मोक्षदा एकादशी आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णानं रणभूमिवर अर्जुनाला गीता सांगितली पाच हजार वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर सांगितलेल्या या गीता ग्रंथाची जयंती आज जगभर साजरी होतेय असा बहुमान असलेला हा एकमेव ग्रंथ आहे या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील शिक्षिका सौ अश्विनी उपासनी सौ शीतल चौधरी सौ पूनम गुरव सौ कीर्ती शिरसाठ भगवती पाटील डिंपल साळी प्रियंका भोई चेतना पाडवी सौ सरला महाजन यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
मांगल्यम इंटरनॅशनल स्कूल प्रकाशा येथे गीता जयंती उत्सहात साजरी*
